शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:07 IST

आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देआॅटोरिक्षा चालकांची मागणीमुंबईत लवकरच बैठक - मंत्र्यांची ग्वाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चात राज्यभरातून आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते. मोर्चाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट देऊन कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.राज्यातील १५ लाख आॅटोरिक्षा चालक सुमारे ११०० कोटी रुपये खासगी विमा कंपन्यांना देतात. परंतु आॅटोचालकाला विम्यातून १०हजार रुपयांचा परतावा मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र  शासनाकडे विमा उतरविण्याचा परवाना आहे. यामुळे जर आॅटोरिक्षा चालकाचा विमा राज्य सरकारने आपल्या परवानाअंतर्गत उतरविला तर राज्य सरकारला फायदा मिळेल, सोबतच कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केला. मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला जाणार नाही, परिवहन मंत्र्यांनी मोर्चात यावे, ही अट मोर्चेकरांनी ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चाला भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारताच तणाव निवळला. या मोर्चात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन, टायगर आॅटोरिक्षा संघटना, आझाद हिंद आॅटो सेना, राष्ट्रवादी आॅटो युनियन व जिल्हा ग्रामीण आॅटोरिक्षा संघटनांचा सहभाग होता. या मोर्चाला आ. कपिल पाटील, आ. जयदेव गायकवाड व आ. प्रतापसिंग पाटील चिखलीकर आदींनी भेटी दिल्या.अवैध वाहतुकीवर कारवाईमोर्चाला सामोरे जाताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महांमडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेतली जाईल. जानेवारी महिन्यापासून अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती राबविली जाईल तर ओला, उबेर यासारख्या कॅब कंपन्यांवर बंधने घातली जातील, असे आश्वासन यावेळी रावते यांनी दिले.अवैध प्रवासी वाहतूक बंद करा,ओला-उबेर कंपन्यांवर कारवाई करा, ई-रिक्षा बंद करा, बोगस परमिटधारकांवर व वाहनांवर कारवाई करा, विमा व शुल्कात झालेली वाढ कमी करा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या . मोर्चाचे नेतृत्व शशांक राव, विलास भालेकर, बाबा कांबळे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर