लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील अत्यंत गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे तांदूळ, पीठ, तेल, तिखट-मीठ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागरिकांनी या संचारबंदीचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना व संचारबंदीच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अत्यावश्यक साहित्याच्या पुरवठ्याबाबत आढावा नितीन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सोलर उद्योग समूहाचे मनीष सत्यनारायण नोवाल, क्रेडाईचे सुनील दुद्दलवार, गौरव अग्रवाल, सोमेश्वर मुंदडा, राजा करवाडे, संतोष चावला आदी यावेळी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तसेच शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे झोपडपट्टी तसेच इतर भागातील नागरिकांच्या दैनंदिन रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनातर्फे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु या गटात न मोडणाऱ्या परंतु गरजू असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनातर्फे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यात पाच किलो तांदूळ, पाच किलो पीठ त्यासोबत मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, साखर, चनाडाळ, पोहे, रवा, चहापत्ती, बेसन तसेच बटाटे व कांदे यांचे एकत्र पॅकेट करून महसूल, पोलीस व महापालिकेच्या मदतीने वाटप करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.उद्योजकांकडून १ कोटी १० लाखांची मदत
गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच : पालकमंत्री नितीन राऊत यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:44 IST
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील अत्यंत गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे तांदूळ, पीठ, तेल, तिखट-मीठ, साखर आदी जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच : पालकमंत्री नितीन राऊत यांचा पुढाकार
ठळक मुद्देप्रशासन व स्वयंसेवी संस्थांतर्फे वाटपपाच किलो तांदूळ, पाच किलो पीठ, मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, साखर, चनाडाळ, पोहे, रवा, चहापत्ती, बेसन, बटाटे व कांदे यांचे एकत्र पॅकेट