शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नागपुरात कोरोनाचा उद्रेक; दिवसभरात समोर आले 1710 नवे कोरोनाबाधित, एकूण मृतांचा आकडा 4415वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 19:00 IST

नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भावाला सुरूवात झाली. सहा महिन्यानी म्हणजे सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठाल होता. 18 सप्टेंबर रोजी सर्वाधिक, 2343 नवे रुग्ण आढळून आले होते. (Eruption of corona virus in Nagpur)

ठळक मुद्देआज सप्टेंबर 2020नंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1710वर गेल्याने चिंता वाढली आहे.धक्कादायक म्हणजे, ही संख्या आणखी वाढणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1,62,053 झाली असून आज 8 रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या 4415 वर पोहचली आहे.

नागपूर- आज सप्टेंबर 2020नंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची (coronaviruses) संख्या वाढून 1710वर गेल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा हा उद्रेक असल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक म्हणजे, ही संख्या आणखी वाढणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. (Eruption of corona virus in Nagpur; During the day 1710 new coronavirus appeared)

नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1,62,053 झाली असून आज 8 रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या 4415 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज 10548 चाचण्या झाल्या. त्या तुलेनत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 16.21 टक्के झाले आहे.

CoronaVirus : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 429 जण कोरोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू   नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भावाला सुरूवात झाली. सहा महिन्यानी म्हणजे सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठाल होता. 18 सप्टेंबर रोजी सर्वाधिक, 2343 नवे रुग्ण आढळून आले होते. परंतु त्यांनतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. नोव्हेंबर महिन्यात तर 50वर रुग्णसंख्या आली होती. परंतु जानेवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादूर्भावाने वेग धरला. 24 फेब्रुवारीपासून रोज हजारावर रुग्णसंख्या जात आहे. पुन्हा सहा महिन्यानंतर मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ग्रामीणच्या तुलनेत शहरात मोठ्या संख्येत रुग्ण वाढत आहे. यावरून महानगरपालिकेची जबाबदारी आणखी वाढणार आहे. आज शहरात 1433 तर ग्रामीणमध्ये 275 रुग्ण आढळून आले.

रेकॉर्ड ब्रेक ! औरंगाबाद जिह्यात मंगळवारी ५५० कोरोना रुग्णांची वाढ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरhospitalहॉस्पिटल