शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:25 IST

एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहक मंचचा निष्कर्ष : आवश्यक कागदपत्रे देऊनही ग्राहकाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला आहे. मंगला चव्हाण असे ग्राहकाचे नाव असून, त्या रेशीमबाग येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई, वडील व भावाचे टपाल विभागात संयुक्त खाते होते. या तिघांच्याही मृत्यूनंतर चव्हाण यांनी टपाल विभागाकडे खात्यातील रकमेची मागणी केली. यासाठी त्यांना वारसान प्रमाणपत्र मागण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र मिळवून टपाल विभागात सादर केले. त्यानंतर त्यांना विनाकारण २०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मागण्यात आला. यासह अन्य सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना खात्यातील रक्कम देण्यात आली नाही. परिणामी त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने त्यांना दिलासा दिला. प्रकरणातील तथ्ये पडताळल्यानंतर मंचला टपाल विभागाच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या.रक्कम परत करण्याचा आदेशग्राहक चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातील १ लाख ९ हजार १८९.४५ रुपये परत करण्यात यावेत, असा आदेश मंचने टपाल विभागाला दिला आहे. त्या रकमेवर २७ नोव्हेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत ७ टक्के व्याज देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, चव्हाण यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर