शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

संविधानामुळेच देशात समानता : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:55 IST

भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देनागपूर  मनपात संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी केले.संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सभापती स्थायी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजित बांगर, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.उपस्थितांनी भारतीय घटनेचि शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुध्दा संविधान उद्देशिकेचे सामूहिकरीत्या वाचन केले.महापौर म्हणाल्या, आज संविधानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपणाला संविधानाने बहाल केलेले हक्क कळणार नाहीत. तोपर्यंत आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थही कळू शकणार नाही. आपल्या भारताचे संविधान कोणा एका व्यक्ती अथवा संस्था अथवा धार्मिक बाबीला अर्पण न करता देशातील प्रत्येक नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहे.अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस, रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अधिक्षक अभियंता मनोज तालेवारी, कार्य. अभियंता गिरीश वासनिक, संजय जैस्वाल, सतीश नेरळ, अविनाश बाराहाते, अमिन अख्तर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्थावर अधिकारी उज्वल धनविजय, पशुचिकित्सा अधिकारी गजेन्द्र महल्ले, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राष्ट्रीय नागपूर कॉपोर्रेशन एम्प्लॉईजचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, राजेश हातीबेड, मनपा मागासवर्गीय संघटनेचे दिलीप तांदळे, विनोद धनविजय, राजकुमार वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.शाळा व झोन कार्यालयात संविधान दिनाचे आयोजनभारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या सर्व शाळा व झोन कार्यालयामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून सर्व शाळांमध्ये व झोन कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच शाळा व झोन परिसरात संविधान रॅली, निबंध स्पर्धा, संविधान लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.नासुप्रत संविधान प्रस्तावनेचे वाचनभारतीय संविधान दिनानिमित्त नासुप्र कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून हा दिवस साजरा करण्यात आला. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, जनसंपर्क व सचिव-१ कल्पना गीते, इमारत अभियंता(उत्तर) ललित राऊत, सचिव-२ विजय पाटील, विभागीय अधिकारी(दक्षिण) अविनाश बडगे, आस्थापना अधिकारी योगीराज अवधूत तसेच नासुप्रचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका