शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:32 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा निश्चय जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने केला.

ठळक मुद्दे ५६१ गावात केले प्लास्टिकचे संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्याचा निश्चय जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनने केला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ५६१ ग्रामपंचायतींमध्ये श्रमदान करून सुमारे २ टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छतेच्या शाश्वत कामांसोबतच घनकचऱ्याचे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे. यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे असून त्याचे संकलन करून पूर्णचक्रीकरण करणे काळाची गरज आहे. हा विचार ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी गणेशोत्सव हे प्रभावी व्यासपीठ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२० अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार पहिल्याच दिवशी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ग्रामपंचायतींमध्ये आज उत्स्फूर्तपणे श्रमदानातून प्लास्टिक संकलन करण्यात आले. यात ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. श्रमदानातून प्लास्टिक संकलन उपक्रमात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये जाऊन श्रमदान केल्यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळाले. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले.सामूहिक श्रमदानजिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राचे सदस्य तसेच ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे सर्व सल्लागार पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सामूहिक श्रमदान करीत असल्याचे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे यांनी सांगितले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर