शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ओळखपत्र तयार करून नीरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:43 IST

बनावट ओळखपत्र तयार करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनोकरी मिळविण्यासाठी बनवाबनवी : तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट ओळखपत्र तयार करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या दोन साथीदारांना बजाजनगर पोलिसांनी अटक केली. पवन प्रकाश नक्शाने (वय २८), रितांशू चंद्रकांत नक्शाने (वय २१) आणि समीर देशपांडे (वय ४१), अशी आरोपींची नावे आहेत.पवनला कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्रही आहे. मात्र तो बेरोजगार आहे. त्याचा चुलत भाऊ रितांशू एका खासगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून नीरीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागला होता. बेरोजगार पवनने रितांशूला तेथे चांगला जॉब असेल तर सांग, असे म्हटले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात अशीच चर्चा झाली. यावेळी नीरीत कॉम्प्युटर आॅपरेटरची नोकरी मिळू शकते, असे सांगून रितांशूने पवनला दोन हजार रुपये मागितले. ही रक्कम घेतल्यानंतर रितांशूने त्याचा ओळखीचा प्रिंटिंग प्रेसचा संचालक समीर याला नीरीचे ओळखपत्र बनवून देण्यास सांगितले. समीरची प्रतापनगरात प्रिंटिंग प्रेस आहे. रितांशूने सांगितल्याप्रमाणे समीरने त्याला नीरीचे बनावट ओळखपत्र बनवून दिले. रितांशूने त्यावर नीरीच्या अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर हे ओळखपत्र घेऊन कॉम्प्युटर आॅपरेटरची नोकरी मिळविण्यासाठी पवनला नीरीत जाण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पवनने सोमवारी सकाळी १० वाजता बनावट ओळखपत्राच्या आधारे नीरीत प्रवेश केला. तो संगणक कक्षाकडे जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. त्याच्या ओळखपत्रावर फोटो नसल्याने सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी पवनला सुरक्षा अधिकारी भुवनेश्वर शिवभूती यादव (वय ४७) यांच्याकडे नेले. यादव यांनी ओळखपत्राची पाहणी केली असता, ते बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते कुठून मिळवले, अशी विचारणा केली असता पवनने रितांशूचे नाव सांगितले. यादव यांनी रितांशूला बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांना घेऊन यादव बजाजनगर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.प्रिंटिंग प्रेसही अडचणीतपोलिसांनी सोमवारी पवन आणि रितांशूला ताब्यात घेतल्यानंतर ओळखपत्र कुणाकडून बनवून घेतले, त्याची चौकशी केली. त्यातून हे ओळखपत्र समीरच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार करण्यात आल्याचे कळाल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रीय स्तराच्या आणि संवेदनशील संस्थेची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून पवन आणि रितांशूसोबत समीरलाही अटक करण्यात आली. या कारवाईमुळे समीरची प्रिंटिंग प्रेसही अडचणीत आली आहे. पोलीस प्रेसलाही सील लावण्याची कारवाई करू शकतात.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी