शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

अतिक्रमण,चोरी, खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 10:21 PM

एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देएमआयडीसी हिंगण्यात चेकपोस्ट वाढविण्याची मागणी : पार्किंगची समस्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे केली. याप्रसंगी एमआयएचे माजी अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर उपस्थित होते.एमआयएतर्फे एमआयडीसी येथील असोसिएशनच्या सभागृहात आयोजित बैठकीत शेगांवकर यांनी एसीपी सिद्धार्थ शिंदे, पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांना हिंगणा औद्योगिक परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती दिली. सध्या कारखान्यांमध्ये चोरी, परिसरात खून आणि अवैध घटना घडत असल्याचे सांगितले.सचिव सचिन जैन म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स झोनमधील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांना ग्रस्त घालण्याची जास्त गरज आहे. शेगांवकर म्हणाले, एमआयडीसी परिसरात अवैध ट्रक पार्किंगची समस्या वाढली असून, ट्रक अनेक महिने एकाच ठिकाणी उभे राहतात. त्यामुळे या भागातील ट्रक आणि गाड्यांच्या वाहतुकीला अडचण निर्माण होते. अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणारे त्रस्त आहेत. एमआयए, पीडब्ल्यूडी अणि एमआयडीसीच्या सहकार्याने या भागात चेकपोस्ट तयार करण्यासाठी तयार आहे. विभागातर्फे परवानगी मिळाल्यास हे कार्य सहजरीत्या पूर्ण होईल.सदस्यांनी सांगितले की, या भागात असामाजिक तत्त्वांची नेहमीच गर्दी असते. अवैध वसुलीवर त्यांचा भर असतो. विशेषत: सायंकाळी आणि रात्री ते जास्त सक्रिय असतात. इलेक्ट्रॉनिक्स झोनमधील महिला कर्मचाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार करण्यापर्यंत त्यांची हिंमत वाढली आहे. एमआयडीसी भागात अवैध कबाडीची दुकाने उघडली आहेत. या ठिकाणी कारखान्यांमधील चोरलेल्या मालाची खरेदी-विक्री होते. चोरीच्या घटनांमध्ये असामाजिक तत्त्वांचा जास्त सहभाग आहे. या भागात अतिक्रमण मोहीम राबविण्याची गरज आहे. वाडी टोलनाक्याजवळ परीक्षा केंद्र असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीमुळे समस्या वाढली आहे.एसीपी सिद्धार्थ शिंदे यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमआयडीसीसोबत चर्चा करून अतिक्रमण निर्मूलन कार्यक्रम आणि अवैध बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या संचालकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात येईल. अधिकाऱ्यांनी तीन महिन्यात बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी असोसिएशनचे सहसचिव प्रवीण पालकर, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. कोषाध्यक्ष मुरली मोहन पंटुला यांनी संचालन केले आणि आभार मानले.

टॅग्स :theftचोरीMurderखूनEnchroachmentअतिक्रमण