शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीकरिता सूट मिळाल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:50 IST

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा नवीन आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देदुकानांसाठी परवाना व ऑड-इव्हन पद्धत रद्द कराआयुक्तांनी व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा आदेश परत घेऊन, ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा नवीन आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, व्यापाऱ्यांच्या एकजुटतेमुळेच आयुक्तांच्या आदेशावर दिलासा मिळाला आहे. आता व्यापाºयांना व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येईल. दुकानांसाठी परवाना आणि ऑड-इव्हन पद्धत रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.अव्यवहारिक आदेश रद्दकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, व्यापाऱ्यांकरिता कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा आदेश अव्यवहारिक होता. आता ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच चाचणी करावी लागेल. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाकडे व्यापाऱ्यांच्या नागपूर बंद आंदोलनाच्या मोठ्या विजयाकडे पाहिले जाते.स्वागतयोग्य पाऊलचेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीबाबत जारी केलेला आदेश रद्द करण्याचे स्वागत केले. आयुक्तांचा आदेश तर्कहीन होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ते म्हणाले, व्यावसायिकांसाठी मनपा आयुक्तांनी दुकानांच्या परवान्यासंदर्भात जारी केलेला आदेश अवैध असून याप्रकरणी सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे.एनव्हीसीसीचे मोठे यश नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कोरोना चाचणीबाबत आयुक्तांनी जारी केलेला नवा आदेश म्हणजे एनव्हीसीसीचे मोठे यश आहे. नागपूर बंद आंदोलनानंतर आयुक्तांच्या नवीन आदेशाचे स्वागत आहे. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या परवान्यासाठी मनपाकडे सध्या आवेदन करू नये, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले. आवेदनासाठी मनपा अधिकाºयांतर्फे दबाव टाकण्यात येत असेल तर त्याची सूचना चेंबरला द्यावी.ऑड-इव्हन पद्धतीत सूट मिळावीनाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, कोरोना चाचणीबाबत आयुक्तांनी जारी केलेल्या नवीन आदेशाचे स्वागत आहे. गृह मंत्रालयाच्या शनिवारी आलेल्या आदेशानुसार राज्यात आणि राज्याबाहेरील लोकांना आणि वस्तूंची ने-आण करण्यासाठी आता वेगळी परवानगी अथवा ई-पास घेणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की, आता व्यापाऱ्यांना व्यवसायात अडथळा येणार नाही. अशा स्थितीत ऑड-इव्हन पद्धत हटवावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस