शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:12 PM

झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.

ठळक मुद्देमोहननगरातील शाळेच्या मैदानात उभारला सेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईहून अमिताभ बच्चन यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मोहननगरातील एका शाळेच्या परिसरात चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्यात आला आहे. ‘बिग बी’ यांची एक झलक मिळेल या अपेक्षेने त्यांचे चाहते परिसरात पोहोचले होते. मात्र त्यांची निराशा झाली. कारण प्रत्यक्षात सोमवारी ‘बिग बी’ शुटिंगला गेलेच नाही. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्येच ते थांबले होते.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शुटिंग ४० ते ४५ दिवस चालणार आहे. मात्र ‘बिग बी’ सलग नागपुरात राहणार नसून आवश्यकतेनुसार ते ये-जा करणार आहेत. मुंबईतील काही समारंभामध्येदेखील त्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे सर्व वेळापत्रक त्या हिशेबाने बनविण्यात आले आहे.‘शुटिंग’च्या परिसरात कडेकोट बंदोबस्त 

मोहननगर परिसरातील एका शाळेच्या मागील बाजूच्या मैदानात चित्रपटाचा ‘सेट’ तयार करण्यात आला आहे. ‘बिग बी’ नागपुरात आल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी तिकडे धाव घेतली. मात्र या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. शाळेच्या मागील बाजूला जाण्यास शाळेतील कर्मचाऱ्
यांनादेखील मज्जाव करण्यात आला आहे. मैदानाकडे जाणाऱ्या दुसऱ्या द्वारातून केवळ परिसरातील रहिवासी व विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष ‘पास’ दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशद्वारावरच नागरिकांना थांबविण्यात येत होते. तर आतील भागात ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत. सोबतच ‘बाऊन्सर्स’ व सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनादेखील आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.कोण आहेत विजय बारसे ?हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंनी दिशा दाखविल्यामुळे घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. शिवाय राज्यभरात ‘स्लम सॉकर’ला तरुणांनी डोक्यावर घेतले.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर