लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईहून अमिताभ बच्चन यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मोहननगरातील एका शाळेच्या परिसरात चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्यात आला आहे. ‘बिग बी’ यांची एक झलक मिळेल या अपेक्षेने त्यांचे चाहते परिसरात पोहोचले होते. मात्र त्यांची निराशा झाली. कारण प्रत्यक्षात सोमवारी ‘बिग बी’ शुटिंगला गेलेच नाही. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्येच ते थांबले होते.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शुटिंग ४० ते ४५ दिवस चालणार आहे. मात्र ‘बिग बी’ सलग नागपुरात राहणार नसून आवश्यकतेनुसार ते ये-जा करणार आहेत. मुंबईतील काही समारंभामध्येदेखील त्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे सर्व वेळापत्रक त्या हिशेबाने बनविण्यात आले आहे.‘शुटिंग’च्या परिसरात कडेकोट बंदोबस्त
चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:16 IST
झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.
चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात
ठळक मुद्देमोहननगरातील शाळेच्या मैदानात उभारला सेट