शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

टीआरएसला नमवून अभियांत्रिकीने जिंकला रेल्वे डीआरएम चषक

By नरेश डोंगरे | Updated: May 31, 2024 20:22 IST

अंतिम सामना गुरुवारी टीआरएस विरुद्ध अभियांत्रिकी विभागाच्या संघात झाला.

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीआरएसच्या संघाला नमवून अभियांत्रिकी संघाने रेल्वे डीआरएम चषक जिंकला. २८, २९ आणि ३० मे अशा तीन दिवसांत पार पडलेल्या या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत रेल्वेच्या विविध विभागाचे ८ संघ सहभागी झाले होते.

लिग कम नॉकआउट या पद्धतीने हे सामने खेळविण्यात आले. अंतिम सामना गुरुवारी टीआरएस विरुद्ध अभियांत्रिकी विभागाच्या संघात झाला.दोन्ही संघाकडून अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन होत असल्याने अखेरपर्यंत हा सामना चुरस वाढवित गेला. शेवटी निर्णायक शॉट लगावत अभियांत्रिकी संघाने २-१ च्या फरकाने हा सामना जिंकला.

स्पर्धेत मॅन ऑफ द सिरिजचा खिताब अभियांत्रिकी संघाचा आशिष केणे याने मिळवला तर आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून टीआरएसच्या श्रवणने उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. टीआरओ संघाचे राजेंद्र कुमार सिंग, ओपीटीजीचे एम. डी. परवेज यांनीही काैशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करून व्यक्तीगत पुरस्कार मिळवले.पुरस्कार वितरण समारंभात एडीआरएम पी. एस. खैरकर यांनी सहभागी संघ आणि सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दलही त्यांनी परिश्रम घेणारांचे काैतक केले.

टॅग्स :nagpurनागपूर