शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नागपुरात इंजिनियरिंंगच्या विद्यार्थिनीसह तिघींची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 20:00 IST

इंजिनियरिंगच्या एका विद्यार्थिनीसह तीन महिलांची छेडखानी करून मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देसीताबर्डीत हॉकरची गुंडागर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंजिनियरिंगच्या एका विद्यार्थिनीसह तीन महिलांची छेडखानी करून मारहाण करण्यात आली.पहिली घटना सीताबर्डी मेनरोडवर घडली. एका हॉकरने महिलेशी आपत्तीजनक वर्तन करून तिच्या पतीला मारहाण केली. टेकडीलाईन येथील निशांत सोनी असे आरोपीचे नाव आहे. तो सीताबर्डी मेनरोड येथे फूटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. तक्रारकर्त्या महिलेनुसार निशांतकडून सोमवारी गारमेंटची खरेदी केली होती. कपडे पसंत न पडल्याने ते बदलविण्यासाठी ती पतीसोबत आली होती. ती ज्या ब्रॅन्डच्या गारमेंटची मागणी करीत होती त्याची किंमत निशांतने १० रुपये अधिक सांगितली होती. निशांत गारमेंट आपल्याजवळ ठेवून तो पैसे परत करू लागला. परंतु तिच्या पतीने पैसे परत घेण्यास नकार दिला. निशांत महिलेच्या पतीच्या खिशात पैसे टाकू लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. पाहता पाहता दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. महिलेनुसार ती भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असता निशांतने तिच्याशीही आपत्तीजनक वर्तन केले. त्यानंतर महिला पतीसोबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पोहोचली. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्याने पीडित दाम्पत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी छेडखानी, मारहाण आणि धमकाविण्याचा गुन्हा दाखल करून निशांतला अटक केली. निशांतनेसुद्धा महिलेच्या पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.दुसरी घटना हिंदुस्थान कॉलनी चौकात घडली. २० वर्षीय इंजिनियरिंगची विद्यार्थिनी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी दुचाकीने जात असताना हिंदुस्थान कॉलनी चौकात हेल्मेट घालण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी धरमपेठ ट्रॅफिक पार्क चौकात राहणारा २० वर्षीय प्रतीक महाजन कारनेविद्यार्थिनीजवळ आला. दोन मिनिटे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु विद्यार्थिनीने नकार देताच तिला पकडून बळजबरीने कारमध्ये बसविले. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार आरडाओरड केल्याने तो आणखी संतापला. त्याने शिवीगाळ करीत आपत्तीजनक व्यवहार केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अल्पवयीन मुलीची छेडखानीनंदनवनमध्ये एका अल्पवयीन मुलीची शेजारी राहणाºयाने छेडखानी केली. २५ वर्षीय राकेश नागदिवे याने सोमवारी दुपारी १७ वर्षीय विद्यार्थिनीसोबत आपत्तीजनक वर्तन केले. विरोध केला असता मारहाण करून धमकावले. नंदनवन पोलिसांनी छेडखानी, धमकावणे आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगnagpurनागपूर