शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:22 IST

Engineer dies after getting stuck in machine मशीनजवळ काम करीत असताना अभियंता अनावधानाने मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील चिचभवन निमजी परिसरातील कंपनीमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे नागपूर-अमरावती महामार्गावरील निमजी परिसरातील लॉजिस्टिक पार्कमधील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्कगाेंडखैरी : मशीनजवळ काम करीत असताना अभियंता अनावधानाने मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील चिचभवन निमजी परिसरातील कंपनीमध्ये गुरुवारी (दि. ६) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

अमित संतोषी चौधरी (२३, रा. सेलगाव, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ताे १४ मैल परिसरातील चिचभवन निमजी शिवारात असलेल्या लाॅजिस्टिक पार्कमधील कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करायचा. ताे गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे कंपनीमधील मशीनसमाेर काम करीत हाेता. त्यातच अनावधानाने ताे मशीनमध्ये अडकला. ही बाब लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापक अभिजित देशमुख व सहकाऱ्यांनी त्याला मशीनमधून बाहेर काढले आणि लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले.माहिती मिळताच अमितच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी कंपनी व नंतर ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यातच प्रमाेद बागडे यांच्यासह इतरांनी मृताच्या कुटुंबीयांना ३० लाखांची आर्थिक मदत करावी तसेच त्याच्या धाकट्या भावाला कंपनीत नाेकरी द्यावी, अन्यथा अंत्यसंस्कार केले जाणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला हाेता. यासंदर्भात त्यांची व्यवस्थापक अभिजित देशमुख व कंपनी व्यवस्थापनाशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू हाेती. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू