शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:24 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा-२००७’वर काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : राज्य शासनावर बसवला दावा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा-२००७’वर काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला.यासंदर्भात संवेदना स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश भावना ठाकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांनी हा आदेश देऊन याचिका निकाली काढली. याशिवाय न्यायालयाने समाज कल्याण विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दावा खर्च बसवून ती रक्कम पीडित काळे दाम्पत्याला देण्यास सांगितले. भविष्यामध्ये आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांना या कायद्याचे संरक्षण न मिळाल्यास न्यायालयाचा अवमान केल्याचे गृहित धरले जाईल अशी तंबीही शासनाला देण्यात आली.कायद्याचे काटेकोर पालन केले जात नाही हे सिद्ध करण्यासाठी याचिकाकर्तीने नागपुरातील काळे दाम्पत्याचे उदाहरण दिले होते. काळे दाम्पत्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. मुलींचे लग्न झाले असून मुलगा त्यांचे पालन-पोषण करीत नाही. मुलगा त्यांना मारहाण व शिविगाळ करतो. कायद्यांतर्गत कार्य करणाऱ्या न्यायाधिकरणने काळे दाम्पत्याला चार हजार रुपये महिना पोटगी देण्याचा आदेश मुलाला दिला होता. मुलाने तीन महिन्यांपर्यंत पैसे दिले. त्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला. असे असताना त्याच्याविरुद्ध कायद्यातील कलम २४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला नाही. तसेच, कलम २५ अंतर्गत शिक्षाही करण्यात आली नाही. हीच परिस्थिती सर्वत्र आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे होते. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे व अ‍ॅड. मिलिंद जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर