शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'अर्थ अवर'मधून दिला ऊर्जा बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:46 IST

ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर्जाबचतीचा संदेश दिला.

ठळक मुद्देमनपा-ग्रीन विजीलचा पुढाकार : एकतास दिवे बंद ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा बचतीचा संदेश देण्यासाठी महापालिका आणि ग्रीन विजील फाऊंडेशनच्या पुढाकारातून 'अर्थ अवर-कनेक्ट टू अर्थ' पाळण्यात आला. महापालिकेच्या आवाहनाला दाद देत नागपूरकरांनी शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळात अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून करून ऊर्जाबचतीचा संदेश दिला.या निमित्त सीताबर्डी येथील इटर्निटी मॉल येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले,धरमपेठ झोन सभापती रूपा राय, माजी महापौर प्रवीण दटके, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महापालिकेतील उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक सुनील हिरणवार, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन विजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी, इटर्निटी मॉलचे महाव्यवस्थापक आशिष बारई उपस्थित होते.ग्रीन विजीलचे मधुसूदन चटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णुदेव यादव, विकास यादव, अमोल भलमे, कार्तिकी कावळे, अमित पालिया, यश केडिया, रोशनी बाघेर, निशित जयपुरिया आदीनी मॉल मधील व्यापाऱ्याना 'अर्थ अवर'बाबत माहिती दिली. ऊर्जा बचत, प्लास्टिक बहिष्कार, पाणी बचत, अन्नाची नासाडी, कागदाचा कमीत कमी उपयोग याविषयी जनजागृती केली.अर्थ अवरची प्रेरणा घेऊन नागपुरात 'पौर्णिमा दिवस' साजरा करण्यात येतो. या दिवशीही रात्री एक तास विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत या माध्यमातून १ लाख २५ हजार किलो कार्बन उत्सर्जन थांबविण्यात यश आले आहे.

टॅग्स :Earthपृथ्वीEco Proइको-प्रो