शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या हृदयस्थळी झाला दहशतवाद्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 10:57 IST

भयानक बॉम्बस्फोट घडवून ज्या दहशतवाद्यांनी देशवासियांचे हृदय छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन दहशतवाद्यांच्या दहशतीचा अंत देशाच्या हृदयदस्थळी झाला.

ठळक मुद्देस्फोटाच्या दोन जीवघेण्या मालिका दहशतवादी याकूब मेमन अन् मोहम्मद हनिफ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भयानक बॉम्बस्फोट घडवून ज्या दहशतवाद्यांनी देशवासियांचे हृदय छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन दहशतवाद्यांच्या दहशतीचा अंत देशाच्या हृदयदस्थळी झाला. याकूब मेमन आणि मोहम्मद हनिफ हे ते दोन दहशतवादी असून, त्यांच्या पापाचा हिशेब नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील भेसूर भिंतीआड झाला. यासोबतच काळ सूड उगवतो, हे या दहशतवाद्यांच्या अंतानंतर पुन्हा एकदा चर्चेला आले.बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीतून आपल्या साथीदारांच्या मदतीने १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. कोणताही दोष नसताना या स्फोटांमध्ये शेकडो निरपराधांचे जीव गेले. शेकडो जणांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. या स्फोटातील दोषींची धरपकड आणि तपास सुरू असताना, १० वर्षांनी पुन्हा मुंबई हादरली.गुजरातमध्ये घडलेल्या जातीय दंगलीचा सूड उगविण्यासाठी मोहम्मद हनिफने २००३ मध्ये गुजरात रिव्हेंज फोर्स तयार केली. पाच ते सात जणांच्या या कथित फोर्समध्ये हनिफची पत्नी फहमिदाही होती. या देशद्रोह्यांनी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या मदतीने दुबईत कट रचला आणि झवेरी बाजारात स्फोट घडवून ३६ निरपराधांचा बळी घेतला, १३८ जणांना गंभीर जखमी केले तर, गेट वे आॅफ इंडियाजवळ स्फोट घडवून १६ जणांना मृत्यूच्या खाईत लोटले तर ३६ लोकांना गंभीर जखमा दिल्या. कोट्यवधींच्या संपत्तीचेही नुकसान केले. १० वर्षांच्या अंतराने झालेल्या या स्फोटाच्या मालिकांनी केवळ मुंबईच नव्हे तर अवघ्या देशाच्या हृदयाला जखमा झाल्या. पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे न्यायालयाने १९९३ च्या मुंबई स्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावली तर २००३ मधीलस्फोटाचा सूत्रधार मोहम्मद हनिफ, त्याची पत्नी फहमिदा तसेच साथीदार अशरतला फाशीची शिक्षा सुनावली. याकूबलाही नागपूरच्या कारागृहात आणि हनिफ तसेच त्याच्या पत्नीलाही नागपूरच्याच कारागृहात ठेवण्यात आले होते. ३० जुलै २०१५ ला याकूबला येथील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.हनिफ आणि त्याच्या पत्नीलाही नागपुरात फाशी देण्याचा निर्णय प्रलंबित असताना ९ फेब्रुवारीला हनिफवर काळाने झडप घातली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. देशाची आर्थिक राजधानी हादरवून सोडणाऱ्या आणि शेकडो निरपराधांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोन दहशतवाद्यांचा देशाच्या हृदयस्थळी असा अंत झाला.

ती पुटपुटली, धाय मोकलून रडलीशनिवारी रात्री हनिफचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुण्या-मुंबईतील नातेवाईकांना कळविण्यात आले. त्यानुसार, दोन मुली, मुलगा, एक जावई आणि हनिफचा एक मेव्हणा रविवारी सायंकाळी नागपुरात पोहचले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अज्ञात सुरक्षित स्थळी थांबवले. मेडिकलमध्ये हनिफचे शवविच्छेदन सुरू होते. तर, पोलिसांच्या गराड्यात त्याचे नातेवाईक बाहेर उभे होते. मध्यवर्ती कारागृहात महिला सेल मध्ये असलेल्या फहमिदासोबत मुला-मुलीचे फोनवरून बोलणे करून देण्यात आले. हनिफला शेवटचे एकदा बघायचे आहे, असे तिने नातेवाईकांना सांगितले.नातेवाईकांनी पोलिसांना कळविले तर पोलिसांनी कारागृह प्रशासनाला कळविले. मुंबई-पुण्यात वरिष्ठ अधिकाºयांशी बोलणी झाल्यानंतर फहमिदाला हनिफचा चेहरा दाखविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सायंकाळी ६ च्या सुमारास मेडिकलमधून हनिफचा मृतदेह घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स थेट कारागृहाच्या आतमध्ये नेण्यात आली. कारण फाशीची कैदी असल्यामुळे फहमिदाला कारागृहाबाहेर काढणे शक्य नव्हते. तिला कारागृहाच्या मुख्य दाराच्या आतमध्ये (झडती परिसर) बसवून ठेवण्यात आले होते. अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवलेला हनिफचा मृतदेह, त्याचा चेहरा फहमिदाने बघितला. ती काही तरी पुटपुटली अन् नंतर धाय मोकलून रडली. ज्या फहमिदाने २५ ऑगस्ट २००३ ला अनेक आर्इंपासून त्यांची मुलं-मली, अनेकांच्या आयाबहिणी, तर अनेकींचे पती क्रूरपणे हिसकावून घेण्याचे पाप केले होते. त्या फहमिदाने मृत पती हनिफचा चेहरा बघून आक्रोश केला.तीनवेळा मृत्युदंड, चारवेळा जन्मठेप, अजूनही बरेच काही !न्यायालयाने दहशतवादी हनिफला शिक्षा सुनावता स्फोटाचा कट रचण्यापासून तो स्फोट घडविण्यापर्यंत एकूण १२ गुन्ह्यात वेगवेगळी (स्वतंत्र) शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार, हनिफला तीन वेळा फाशी (मृत्युदंड), चार वेळा जन्मठेप, २६ वर्षांचा सश्रम कारावास आणि एकूण १ लाख, ७३ हजारांचा दंड भरायचा होता. मात्र, यातील कोणतीही शिक्षा पूर्ण झालेली नाही. हनिफला काळानेच मृत्यूच्या दाढेत ओढून नेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी