शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:37 AM

छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात निपुण होऊन स्वराज्याचे हित जोपासले. एकेक मुलुख ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार केला. सैन्य वाढविले, किल्ले ताब्यात घेतले. अखेरपर्यंत औरंगजेबाशी झुंज देऊन त्याच्या नाकीनऊ आणले. स्वराज्याचा विस्तार करून नऊ राज्य ताब्यात घेत संभाजी महाराजांनी स्वराज्याला उंचीवर नेले, असे प्रतिपादन सातारा येथील शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.सन्मित्र सभा, नागपूरच्यावतीने दक्षिण अंबाझरी मार्गावरील मुंडले सभागृहात ‘संभाजी महाराजांचा राष्ट्रधर्म’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मंगेश काशीकर होते. व्यासपीठावर सन्मित्र सभेचे अध्यक्ष डॉ. संजय घटाटे, अरविंद गरुड उपस्थित होते. प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कामाचे नियोजन महत्त्वाचे असून नियोजनाद्वारेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मातृछत्र हरविल्यानंतर संभाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रात निपुण झाले. १६ भाषांवर प्रभुत्व मिळविले. शिवाजी महाराजांनी हवा तसा आपला पुत्र घडविला. साडेआठ वर्षांचे असताना संभाजींचा राजकारणात प्रवेश झाला. आग्रा येथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटताना संभाजींनी शिवाजी महाराजांना तुमची स्वराज्याला गरज आहे, तुम्ही पुढे जा, असे सांगून आपल्या राष्ट्रधर्माचा परिचय दिला. पुढे संभाजी महाराज खटल्यांचा निकाल देऊ लागले. दान प्रमुख करून शिवाजी महाराजांनी त्यांना दानाचे महत्त्व शिकविले. संभाजी महाराजांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांच्या आयुष्यात राणी येसुबाई शिवाय दुसरी कोणतीही स्त्री नव्हती. परंतु चुकीचा इतिहास रंगवून त्यांना नाटक, चित्रपटातून बदनाम करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संभाजींवर दिलेरखानाला जाऊन मिळाल्याचा आरोप करण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात शिवाजींनीच त्यांना राष्ट्रहितासाठी दिलेरखानाकडे पाठविले. संभाजी पन्हाळ्यात कैदेत होते, असा आरोप होतो. परंतु ते कधीही कैदेत नव्हते.राजारामच्या लग्नाला न येण्यामागे ते बुऱ्हाणपुराच्या लढाईत व्यस्त असल्याचे कारण होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य ताब्यात घेऊ अशी औरंगजेबाची भूमिका होती. परंतु संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत त्याला स्वराज्यात प्रवेश करू दिला नाही. एकटा रामशेज किल्ला घेण्यासाठी पाच वर्षे झुंजवत ठेवले. गोवा, तामिळनाडु, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार अशा नऊ राज्यांवर भगवा फडकवून अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झुंज दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संजय घटाटे यांनी केले. यावेळी डॉ. धनंजय मोडक यांनी सन्मित्र सभेची प्रार्थना म्हटली. सोमलवार निकालसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शिल्पा नंदनपवार यांनी केले. आभार अरविंद गरुड यांनी मानले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीnagpurनागपूर