शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भय संपता संपेना, २४ तासात ७९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवकं नागपूर : कोरोना जीवावर उठलाय. भय संपता संपेना, अशीच स्थिती सध्याची आहे. मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ ...

लोकमत न्यूज नेटवकं

नागपूर : कोरोना जीवावर उठलाय. भय संपता संपेना, अशीच स्थिती सध्याची आहे. मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ वाढतच चालला आहे. शनिवारी ६,९५६ पॉझिटिव्ह आढळून आले तर २४ तासात सर्वाधिक ७९ लोकांचे कोरोनाने जीव घेतले. यात शहरातील ४०, ग्रामीणमधील ३३ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. मागील १३ महिन्यांचा विचार करता सप्टेंबरनंतर एप्रिल महिन्यात मृत्यूने हा उच्चांकच गाठला आहे. १ ते १७ एप्रिल या कालावधीत १,०८७ लोकांचा मृत्यू झाला. मागील दहा दिवसांचा विचार करता ७ एप्रिलपासून १४ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज ६० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. पहिल्या लाटेत १७ सप्टेंबरला सर्वाधिक ६४ मृत्यू झाले होते.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १,४०६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर एप्रिल महिन्यात १७ दिवसात १०८७ मृत्यू झाले. एप्रिल महिन्यातील मृत्यूचे आकडे बघता आधीचे सर्व रेकॉर्ड तुटण्यायाची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात चारवेळा ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात १७७ मृत्यू झाले. तर मार्च महिन्यात मृतांची संख्या ७६३ झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात २४,१६३ पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर ९१९ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १४६५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मृत्यूने उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

...

मागील १० दिवसातील पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू

७ एप्रिल ५,३३८ ६६

८ एप्रिल ५,५१४ ७३

९ एप्रिल ६,४८९ ६४

१० एप्रिल ५,१३१ ६५

११ एप्रिल ७,२०१ ६३

१२ एप्रिल ५,६६१ ६९

१३ एप्रिल ६,८२६ ६५

१४ एप्रिल ५,९९३ ५७

१५ एप्रिल ५,८१३ ७४

१६ एप्रिल ६,१९४ ७५

१७ एप्रिल ६,९५६ ७९

.....

६,९५६ पॉझिटिव्ह, ५००४ बरे झाले

नागपूर जिल्ह्यात शनिवारी ६९५६ पॉझिटिव्ह आढळून आले. ५००४ संक्रमित बरे झाले. सोबतच संक्रमितांची संख्या ३,१५,९९९ व मृतांची संख्या ६,१८८ आहे. आज शहरातील ३,८८० तर ग्रामीण मधील १,१२३ रुग्ण बरे झाले. आतापर्यत २,४३,६०३ संक्रमित बरे झाले. रिकव्हरी रेट ७७.०८ वर पोहचला आहे.

...

२९,०५३ टेस्ट, ५१,१२३ होम आयसोलेशनमध्ये

नागपूर जिल्ह्यात शनिवारी विक्रमी २९,०५३ नमुने तपासण्यात आले. यात शहरातील १४,६०५ व ग्रामीणमधील १४,४४८ नमुन्यांचा समावेश आहे. यात गृहविलगीकरणात ५१,२१३ रुग्ण आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात १४,९७३ उपचार घेत आहेत. मेडिकल कॉलेज ८९४, मेयो ५६५, एम्स ९६, इंदिरा गांधी रुग्णालय ९९, आयसोलशन १६ व आयुष रुग्णालयात ४२ संक्रमित आहेत.

...

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ६६,२०८

बरे झालेले २,४३,६०३

मृत ६,१८८

....