शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

 मोजमापासाठी पैसे नसल्याने तीस मामा तलावांवर अतिक्रमण; जिल्हा नियोजनकडे ३.६२ कोटींची मागणी

By गणेश हुड | Updated: November 17, 2023 19:18 IST

जिल्हा परिषदेचे  जिल्ह्यामध्ये ४७० माजी मालगुजारी (मामा) तलाव व १३४ लघु सिंचन तलाव आहेत.

नागपूर : जिल्हा परिषदेचे  जिल्ह्यामध्ये ४७० माजी मालगुजारी (मामा) तलाव व १३४ लघु सिंचन तलाव आहेत. परंतु मागील अनेक वर्षात सर्वेक्षण व मोजमाप  झालेले नाही. मोजमाप करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तलावावर मोठयाप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे ३० तलाव दुसऱ्याच्या नावावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मामा तलाव व लघुसिंचन तलावावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला होता. एका तलावाचे सिमांकण करण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. ६०४ तलावांचा विचार करता यासाठी ३ कोटी ६२ लाख ४० हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा परिषदेला हा निधी खर्च करणे शक्य नसल्याने  यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. लघुसिंचन विभागांतर्गत मामा तलाव व लघुसिंचन तलाव येतात. परंतु मामा तलावावर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास तलाव नामशेष होण्याचा धोका आहे. मागील अनेक वर्षापासून  तलावावर अतिक्रमण होत असतानाही ठोस अशी कार्यवाही झालेली नाही.  ३० तलाव दुसऱ्याच्या नावावरजिल्हा परिषदेचे ६०४ तलाव आहेत. परंतु अनेक तलावांवर अतिक्रमण झाले आहे. ३० तलाव हे दुसऱ्याच्या नावावर आहेत.  काही तलाव महसूल विभागाच्या नावावर असल्याने सातबाऱ्यात फेरफार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांनी  सभेत दिली होती. २४ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूर