शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:09 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.कृषी महोत्सवात कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना मिळणार आहे. समूह, गट संघटित करून शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करण्यात येणार आहे. कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देण्यात येणार आहे. महोत्सवात २०० स्टॉल राहणार आहे. यात शेतकऱ्यांना नि:शुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला किमान दहा हजार लोक भेटी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलिनी भोयर व प्रकल्प उपसंचालक ए. एम. कुसळकर उपस्थित होते. नॉफ्प्स नावाने सेंद्रीय शेतकऱ्यांचे ब्रॅण्डिंगविषमुक्त अन्न काळाजी गरज झाली आहे. जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांचे गट सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन करीत आहे. या शेतमालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना सुद्धा सेंद्रीय शेतमाल खरेदी केल्याची हमी मिळावी या दृष्टीने सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाचा नागपूर ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. नागपूर आॅर्गेनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम नावाने हा ब्रॅण्डचे महोत्सवात लाँचिंग होणार आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी