शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस सिटी सदनिका खरेदीदारांची राष्ट्रीय ग्राहक आयोगात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:05 IST

गांधीसागर तलावाजवळच्या एम्प्रेस सिटी गृह प्रकल्पातील ६३ सदनिका खरेदीदारांनी त्यांचे पैसे १६ टक्के व्याजासह परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात संयुक्त तक्रार दाखल केली आहे. बिल्डरने सहा वर्षे लोटूनही प्रकल्प पूर्ण केला नाही असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांमध्ये पवनकुमार जैन व इतरांचा समावेश आहे.

ठळक मुद्देतक्रार दाखल : रिवॉर्ड रियल इस्टेट व केएसएल इंडस्ट्रीजला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावाजवळच्या एम्प्रेस सिटी गृह प्रकल्पातील ६३ सदनिका खरेदीदारांनी त्यांचे पैसे १६ टक्के व्याजासह परत मिळविण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात संयुक्त तक्रार दाखल केली आहे. बिल्डरने सहा वर्षे लोटूनही प्रकल्प पूर्ण केला नाही असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांमध्ये पवनकुमार जैन व इतरांचा समावेश आहे.प्रकरणावर आयोगाच्या न्यायाधीश दीपा गुप्ता व सदस्य प्रेम नारायण यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर आयोगाने प्रकरणातील प्राथमिक तथ्ये लक्षात घेता बिल्डर्स रिवॉर्ड रियल इस्टेट व केएसएल इंडस्ट्रीज यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्यांनी १५०० चौरस फुटाच्या थ्री-बीएचके सदनिका प्रत्येकी ६२ लाख रुपयांत खरेदी केल्या आहेत. त्यांनी २६ मे २०१२ ते ३० आॅगस्ट २०१५ पर्यंत बिल्डर्सला संपूर्ण रक्कम अदा केली आहे. बिल्डर्सने ३०० खरेदीदारांकडून सुमारे २०० कोटी रुपये स्वीकारले आहेत. असे असताना प्रकल्प वेळेत पूर्ण करून खरेदीदारांना सदनिकांचे विक्रीपत्र करून देण्यात आले नाही व सदनिकांचा कायदेशीर ताबा देण्यात आला नाही. प्रकल्पात फ्लॉवर बेड, पोडियम गार्डन, हेल्थ क्लब, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलतरण तलाव, योगा रुम, स्पा रुम, बॅन्क्वेट हॉल, सीसीटीव्ही, जिमनॅशियम, सेक्युरिटी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. पर्यावरण, इमारत पूर्णत्व, अग्निशमन व भोगवटा प्रमाणपत्रे मिळविण्यात आली नाहीत. अशाप्रकारे दोन्ही कंपन्यानी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून व सेवेत त्रुटी ठेवून खरेदीदारांची फसवणूक केली असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहण मालविया यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर