शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मेळघाटात टाकाऊ घाणेरी होणार आदिवासींसाठी रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 10:55 IST

टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्दे जंगल स्वच्छता मोहिमेलाही हातभार

सविता देव हरकरे।आॅनलाईन लोकमतनागपूर: देशभरात स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शहरे आणि गावांची स्वच्छता करण्याचा चंग शासनाने बांधला असतानाच वनक्षेत्रांमध्येही अशा स्वच्छतेची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे आणि ही स्वच्छता करीत असताना वनांमधून निघणाऱ्या कचऱ्यापासून कलात्मक निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर अधिक उत्तम.टाकाऊ घाणेरीपासून फर्निचर आणि शोभिवंत वस्तू निर्मितीचा असाच एक अभिनव प्रयोग सध्या मेळघाटात सुरू आहे. विशेष म्हणजे परिसरातील आदिवासींना यातून रोजगारही उपलब्ध होत आहे.विदर्भाच्या गावागावात व गावाबाहेरील जंगलांमध्ये घाणेरी म्हणजेच रायमुनिया या तण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीने उच्छाद मांडला आहे. घाणेरी पसरायला लागली की गवत वाढत नाही. घाणेरी पसरलेल्या भागात पाळीव गुरांना व वन्यप्राण्यांना चारा मिळेनासा होतो.घाणेरीचे हे धोके लक्षात घेता वनविभाग व व्याघ्र प्रकल्प, मेळघाटमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर घाणेरी निर्मूलनाचे काम हाती घेत असते.परंतु आता हीच टाकाऊ घाणेरी मेळघाटमध्ये स्थानिक निसर्ग संरक्षण संस्थेच्या प्रयत्नातून आदिवासींसाठी रोजगाराचे साधन होत आहे. निसर्ग संरक्षण संस्था, अमरावती व सातपुडा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे या कार्यात पुढाकार घेतला आहे. संस्थेतर्फे सर्वप्रथम इ.स. २००७ साली नागपूर जिल्हा व मध्य प्रदेशांतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पात हा प्रयोग करण्यात आला होता.त्यानंतर २०१२ साली होशंगाबाद जिल्ह्यातील मटकुली (पचमढी) येथे तर या कार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याद्वारे गावातील ७८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष व या संकल्पनेचे प्रणेते किशोर रिठे यांनी यावर्षी हा यशस्वी प्रयोग मेळघाटमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आणि अलीकडेच आयोजित शिबिरात आदिवासी तरुणतरुणींना घाणेरीपासून नानाविध आकर्षक, शोभिवंत वस्तू आणि फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. मध्य भारतात प्रथमच सातपुडा फाऊंडेशनने हा उपक्रम हाती घेतला असून देशभरात त्याचे अनुकरण झाल्यास जंगलांमधील कचरा स्वच्छ होण्यासोबतच त्यापासून परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

या वस्तू अतिशय देखण्या व टिकाऊ आहेत. त्यांना आता बाजार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी

मेळघाटमध्ये तयार झालेल्या या आकर्षक वस्तू मुठवा समुदाय केंद्रात लवकरच उपलब्ध होतील यासाठी आता आम्ही प्रयत्न करू.- डॉ. निशिकांत काळे,निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प