शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

कर्मचाऱ्यांचा संप, रुग्णांचे हाल

By admin | Updated: June 22, 2014 01:05 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा संप संपत नाही तोच कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला.

मेडिकल : ४०० कर्मचाऱ्यांचा सहभागनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा संप संपत नाही तोच कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला. यामुळे रुग्णसेवेसोबतच कार्यालयीन सेवाही प्रभावित झाली. वॉर्ड आणि शस्त्रक्रियेच्यासमोर विशेषत: जैविक कचरा जागोजागी पडून होता.मेडिकलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागा भरण्यातच आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. याचा फटका रुग्णांनाही बसत आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जाती-जमाती कर्मचारी संघाच्यावतीने हा संप पुकारण्यात आला होता. विशेष म्हणजे सलग तीन दिवस निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मेडिकल प्रशासन अडचणीत आले होते, त्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज सर्वांचीच तारांबळ उडाली होती. दुपारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आश्वासनाचे लेखी पत्रच हातात दिल्याने सायंकाळी हा संप मागे घेण्यात आला. संपामध्ये सकाळच्या पाळीतील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे बाह्यरुग्ण विभागापासून ते वॉर्डात आज सफाईची कामेच झाली नाही. यामुळे वापरलेले ग्लोव्हज, कॉटन, जैविक कचऱ्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लाल रंगाच्या प्लास्टिकच्या बॅग्स् वऱ्हांड्यात पडून होत्या. कर्मचारी नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनाच आॅक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर ओढावे लागले. तर कर्मचाऱ्यांची काही कामे परिचारिकांना करावी लागली. संपाचा फटका अधिष्ठाता कार्यालयालाही बसला. ‘क’ वर्गातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. हा संप महाराष्ट्र जाती जमाती कर्मचारी संघाचे केंद्रीय महासचिव आर.सी. अंंभोरे, राजेश निंबाळकर, जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खोंडकर व इंटक जिल्हा अध्यक्ष राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आला.(प्रतिनिधी)