शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
5
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
6
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
7
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
8
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
9
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
10
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
11
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
12
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
14
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
15
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
16
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
17
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
18
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
19
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
20
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता

पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघातएक कर्मचारी जखमी : भिष्णूर परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 02:53 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पोलिसांचे भरधाव वाहन वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटले.

नरखेड : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ताफ्यातील पोलिसांचे भरधाव वाहन वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटले. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. ही घटना जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलफाटा ते नरखेड मार्गावरील भिष्णूर गावाजवळ सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सरफराज अहमद शेख (ब.नं. १३०५०, नागपूर शहर पोलीस विभाग) असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. सरफराज शेख हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोलीस ताफ्यासोबत होते. चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारी सकाळी नरखेड तालुक्यातील जामगाव (बु) येथे वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. येथे त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या अणि रोहणा येथे कार्यक्रमाला निघून गेले. पालकमंत्र्यांना काटोल तालुक्यातील मसली, वंडली, कलंभा शिवारात करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार उपक्रमातील कामांची पाहणी करावयाची होती. त्यामुळे रोहणा येथील कार्यक्रम आटोपताच हा ताफा बेलफाटा-भिष्णूर मार्गे मसलीकडे जायला निघाला.दरम्यान, भिष्णूर गावालगत असलेल्या डोंगराच्या वळणावर एमएच-३१/एजी-९९१२ क्रमांकाच्या पोलीस वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला आणि सदर वाहन रोडच्या कडेला उलटले. या वाहनात बसलेल्या सहायक फौजदार दिवाकर तेलमोरे, सहायक फौजदार तिवारी, हेडकॉन्स्टेबल शेख आणि पोलीस शिपाई सफराज शेख यांच्यापैकी सरफराज शेख हे जखमी झाले. यात त्यांच्या उजवा हात व पायाला दुखापत झाली. त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज करांडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन सरफराज शेख यांची भेट घेत चौकशी केली. (तालुका प्रतिनिधी)