लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिक्षेकरी स्वीकार केंद्रातील कर्मचाऱ्याने गळफास लावल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात भिक्षेकरी स्वीकार केंद्र आहे. तेथे काम करणारा गोपाल गौतम रंगारी (१८) याने रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी २.१५ ला ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच संबंधित अधिकारी आणि जरीपटका पोलीस तेथे पोहचले. अशोक शालीकराम टेकाम (३५, रा. मांडला ता. आर्वी, जि. वर्धा) यांनी दिलेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. रंगारीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली त्याचा तपास सुरू आहे.कोतवालीतही आत्महत्याआत्महत्येची दुसरी घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. कोतवालीतील शिवाजीनगरात राहणारा राजेश गणेश सपाटे (३४) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मंगेश गणेश सपाटे (२४) यांनी दिलेल्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात कर्मचाऱ्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 20:50 IST
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिक्षेकरी स्वीकार केंद्रातील कर्मचाऱ्याने गळफास लावल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
नागपूरच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रात कर्मचाऱ्याने लावला गळफास
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अज्ञात