शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:42 IST

पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देकपिलनगर, पारडी, वाठोडा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) बी.जी.गायकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त, (उत्तर विभाग) शशिकांत महावरकर, पोलीस उपआयक्त निर्मलादेवी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, पोलीस उपआयुक्त (डीटेक्शन)गजानन राजमाने, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) विक्रम साळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पोलिसांना देण्यात येणाऱ्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलीस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी मागील चार वर्षात शासनाने ९०० कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलीस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले.जरीपटका पोलीस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलीस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या तीनही पोलीस ठाण्यांना आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करूशहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी गोन्हीसिम येथे बोलताना केले.पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते बहादुरा, खरबी व गोन्हीसिम या तीनही ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPolice Stationपोलीस ठाणे