शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्पाईसजेट विमानाचे आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:51 IST

बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाला (एटीसी) देत आकस्मिक लॅण्डिंग केले. विमान सकाळी ९ वाजता गुवाहाटीकडे रवाना झाले.

ठळक मुद्देमहिला प्रवाशाची तब्येत बिघडली : आयसीयूमध्ये भरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे एका वयस्क महिला प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. वैमानिकाने महिलेची तब्येत बिघडल्याची सूचना नागपूरच्या हवाई नियंत्रण कक्षाला (एटीसी) देत आकस्मिक लॅण्डिंग केले. विमान सकाळी ९ वाजता गुवाहाटीकडे रवाना झाले.स्पाईसजेटचे एसजी-४६३ विमान सकाळी ५.४५ वाजता हैदराबाद येथून गुवाहाटीडे रवाना झाले. ८२ जागांच्या विमानात १८-ई सीटवर ६५ वर्षीय देबिका चक्रबर्ती आणि १८-डीवर त्यांचा मुलगा प्रोनबीस चक्रवर्ती प्रवास करीत होते. विमानाने उड्डाण भरल्यानंतर ४५ मिनिटांत देबिका यांची तब्येत बिघडली. या घटनेची माहिती प्रोनबीसने क्रू सदस्याला तर क्रूने वैमानिकाला दिली. वैमानिकाने नागपूर एटीसीकडून परवानगी घेऊन विमान सकाळी ६.४५ वाजता विमानतळावर उतरविले. स्पाईसजेट सेवांशी जुळलेली कंपनी ज्यूनस एव्हिएशन प्रा. लि.चे पर्यवेक्षक कामरान शम्स यांना सूचना मिळतात त्यांनी त्वरित घटनेची माहिती विमानतळावरील अधिकाºयांना दिली आणि अ‍ॅम्ब्युलन्स मागितली. त्यानंतर देबिका यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी रुग्णाला २४ तास निगराणीत ठेवण्याचा सल्ला दिला. देबिका यांच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.इंडिगोच्या तीन उड्डाणांचा आॅनलाईन लपंडाव!इंडिगो एअरलाईन्सचे तीन उड्डाण आॅनलाईनवर दिसून येतात तर कधी गायब होतात. गेल्या दोन आठवड्यापासून कंपनीचा असा लपंडाव सुरू आहे. इंडिगोच्या या उड्डाणांमध्ये ६ई-३८८ नागपूर-इंदूर, रात्री १०.३५ वाजता येणारे ६ई-९०९ नागपूर-बेंगळूरू आणि सकाळी ७.१० च्या ६ई-६६४ नागपूर-कोलकाताचा समावेश आहे.असे दिसून आले की, कोणतेही विमान कोणत्यातरी दिनविशेषवर रद्द असते. परंतु हे उड्डाण एक दिवस तर कधी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ रद्द असते. पुढील सात दिवसानंतर या उड्डाणाची स्थिती काय राहील, या संदर्भात स्थानिक स्तरावर ठोस माहिती नाही, ही बाब आश्चर्यजनक आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्यास विमानाचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याचे नेहमीच आढळून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अ‍ॅडव्हान्स बुकिंग असल्यास आणि पुढेमागे बुकिंगच्या स्थितीवर लक्ष ठेवून विमानाचे उड्डाण होते वा रद्द करण्यात येते. उदाहरण द्यायचे झाल्यास रात्री १०.३० वाजताचे नागपूर-बेंगळुरू विमान-९०९ चे उड्डाण १५ डिसेंबरला होणार नाही, पण १६ आणि १७ डिसेंबरला उपलब्ध आहे. सायंकाळी ७.१० वाजताचे विमानाचे उड्डाण १५ फेब्रुवारीपर्यंत रद्द असल्याचे आॅनलाईनवर दिसून येत आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरspicejetस्पाइस जेट