शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

‘चीनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवार करणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 7:06 PM

घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात ‘चायनीज’ वस्तूंविरोधात मोहिम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेशभरात ‘चायनीज’ वस्तूंचा विरोध करणार : स्वदेशी जागरण मंचचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये चीननेदेखील पाकिस्तानचीच री ओढली. भारतातील अंतर्गत मुद्द्यांमध्ये चीनकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न होत असताना संघ परिवाराने आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात ‘चायनीज’ वस्तूंविरोधात मोहिम राबविण्यात येणार आहे.स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भुमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. स्वस्त दरात विक्रीच्या नावाखाली चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. याचा फटका देशातील अनेक लहान उद्योगांना बसला तर अनेक पारंपारिक उद्योग अक्षरश: डबघाईस आले.आता भारत-पाक संबंध ताणले गेले असताना जगातील बहुतांश देश भारताच्या बाजूने आहेत. परंतु चीनकडून पाकिस्तानचीच बाजू घेण्यात येत आहे. सणासुदीच्या तोंडावर ‘चायनिज’ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे चीनला आर्थिक दणका देण्यासाठी स्वदेशी जागरण मंचातर्फे देशपातळीवर ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहसंयोजक डॉ.अश्वनी महाजन यांनी दिली.‘डोकलाम’च्या वेळी झाला होता प्रयोग२०१७ साली डोकलामच्या मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारताने कठोर भुमिका घेतल्यामुळे चीनकडून वेगवेगळ््या माध्यमातून धमकी देण्यात आली. चीन देशासाठी धोकादायक ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर संघ परिवाराने चीनला आर्थिक दणका देण्यासाठी पावले उचलण्याचा संकल्प केला व याअंतर्गतच ‘चायनिज’ वस्तूंविरोधात देशपातळीवर मोहिम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेला जनमानसातून समर्थन मिळाले होते.गृहसंपर्कावर राहणार भरस्वदेशी जागरण मंचतर्फे या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनिज’ वस्तूंमुळे देशासमोर निर्माण झालेले संकट, त्याचे धोके याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येईल. चीनचे वित्तीय आक्रमण परतावून लावण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यात येईल. ‘चायनीज’ वस्तूंचा वापर नागरिकांनी शक्य तितका थांबवावा, यासाठी स्थानिक पातळीपासून मोहिम राबविण्यात येणार आहे. यात ‘सोशल मिडीया‘चीदेखील मदत घेण्यात येणार आहे.

टॅग्स :chinaचीनRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ