शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे वीज मनोरा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:28 IST

नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मनोरा कोसळताना महावितरणच्या वाहिनीवर कोसळल्याने महावितरणची वाहिनीही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, झालेल्या या हानीची पाहणी करून वितरण यंत्रणा त्वरित उभी करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देमहावितरण प्रादेशिक संचालकांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे सावनेर तालुक्यातील रिठी-पारडी गावाजवळ अदानी कंपनीच्या ७६५ केव्ही तिरोडा-तिरंगी या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीचा एक मनोरा पूर्णपणे जमीनदोस्त झाला तर इतर दोन मनोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा मनोरा कोसळताना महावितरणच्या वाहिनीवर कोसळल्याने महावितरणची वाहिनीही मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे, झालेल्या या हानीची पाहणी करून वितरण यंत्रणा त्वरित उभी करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिल्या आहेत.रिठी-पारडी येथील घटनास्थळी भालचंद्र्र खंडाईत यांनी भेट देत एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला, यावेळी त्यांच्यासमवेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अदानीचे उपमहाव्यवस्थापक रामकृष्ण राऊत, वरिष्ठ व्यवस्थापक अमरनाथ आणि ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते. हा अजस्त्र उच्चदाब मनोरा महावितरणच्या वाहिनीवर कोसळून कृषीपंपासाठीच्या लघुदाब वाहिनीचे तब्बल २० खांब क्षतिग्रस्त झाल्याने वीज वितरण सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत, त्यांचे तात्काळ निराकरण करून वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी महावितरण आणि अदानीच्या सर्व संबंधितांना यावेळी दिल्या. ही लघुदाब वीजवाहिनी त्वरित उभारून कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम महावितरणकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर