शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे १७ कोटी रुपयांची वीज थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:37 IST

वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस बजावणे सुरू केले आहे. थकबाकी न भरणाऱ्या  शासकीय आस्थापनांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी महावितरणची नोटीस : सर्वाधिक थकबाकी पाणी पुरवठा योजना आणि पथदिव्यांकडे

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस बजावणे सुरू केले आहे. थकबाकी न भरणाऱ्या  शासकीय आस्थापनांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वसुली व्हावी यासाठी मुख्य अभियंत्यापासून सर्व वरिष्ठ अधिकारीवर्गाने जातीने शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयात भेटी देऊन आढावा घेणे सुरू केले आहे. नागपूरपरिमंडलांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २४०२ ग्राहकांकडून २ कोटी २४ लाख ४१,५२० रु. वसूल करायचे आहेत. पथदिव्यांच्या ४३३६ वीज जोडण्याकडे ३ कोटी ९२ लाख ९६,७५० रुपयांची थकबाकी आहे. यापैकी वर्धा जिल्ह्यातील ७७५ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे १ कोटी ४७ लाख ७४,०७४ रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय १३५० पथदिव्यांची १ कोटी ७८ लाख ९६,७९३ रुपयांची थकबाकी आहे. नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयांतर्गत १४०९ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे ६७ लाख २४,५८३ रुपयांची थकबाकी आहे. १३५० पथदिव्यांची १ कोटी ७८ लाख ९६,७९३ रुपयांची थकबाकी आहे. पाणी पुरवठा योजनेसोबत विविध शासकीय विभागाकडून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निवासस्थानांच्या थकबाकीची रक्कम ७० लाखाच्या घरात गेली आहे. १७,८६७ कर्मचाऱ्यांनी महावितरणची वीज वापरून देयकाची रक्कम अदा केलेली नाही. केंद्र शासनाच्या १६० आस्थापनाकडे सुमारे ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ११७० वीज जोडण्या असून २ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे.या विभागांची थकबाकी शून्यभारतीय लष्कराने आपल्या शिस्तीचा परिचय येथे देत शून्य थकबाकी ठेवली आहे. लष्करासोबतच राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग, शहरी विकास मंत्रालय, गृह निर्माण विभाग, आदिवासी विकास विभाग, रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाकडे शून्य थकबाकी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर