शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वीज महागडी, महावितरणचा युक्तिवाद निराधार

By आनंद डेकाटे | Updated: June 28, 2024 20:56 IST

स्वत:च्या कृत्यावर पांघरूण, वाढलेल्या मागणीचे दिले कारण : इंधन समायोजन शुल्काची वसुली का?

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महागड्या दराने वीज खरेदी करणाऱ्या आणि इंधन समायोजन शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकणाऱ्या महावितरणने जून महिन्यात आलेल्या भरघोस बिलांबाबत बिनबुडाचे तर्क दिले आहेत. वाढलेल्या वीजबिलासाठी ग्राहकांच्या वाढत्या विजेच्या मागणीला कंपनीने कारणीभूत ठरविले आहे. कंपनीने आपल्या गैरकृत्यांवर पांघरूण घालताना सांगितले की, उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंखे यांचा भरपूर वापर केला जातो. साहजिकच त्यामुळे बिल वाढले, असे महावितरणचे म्हणणे आहे.

'लोकमत'ने २८ जूनच्या अंकात १ एप्रिलपासून लागू होणारे नवीन वीजदर, वाढलेली मागणी, फिक्स्ड चार्ज, व्हीलिंग चार्ज आणि इंधन समायोजन शुल्क यांचा हवाला देत जून महिन्यात आलेले विजेचे बिल ३० टक्क्यांपर्यंत अधिक आल्याचे उघड केले होते. या वृत्ताने महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. जूनमध्ये कोणतीही नवीन दरवाढ झालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे. जे सांगितले आहे ते बरोबर आहे. लोकमतने सुद्धा जूनमध्ये कुठलीही वाढ झाल्याचे म्हटलेले नाही. केवळ १ एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दराचे परिणाम आता दिसून येत असल्याचे स्पष्ट केले आहे. फिक्स्ड चार्ज, व्हीलिंग चार्ज आणि इंधन समायोजन शुल्क (एफएसी) देखील वसूल करण्याबाबत कंपनीने मौन बाळगले आहे. या सर्व आरोपांमुळे कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महागडी वीज खरेदी करून लोकांकडून एफएसी वसुली केव्हा थांबणार, असा प्रश्नही उपस्थित होतो.

१ एप्रिलच्या आदेशात आयोगाने मूळ दरामध्ये एफएसी चा समावेश करून महावितरणला हवे असल्यास ते आकारू शकते, असे सांगितले होते. आता त्याचा फायदा घेत महावितरण सातत्याने हे शुल्क आकारत आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, मार्च महिन्यात घरगुती ग्राहकांनी राज्यात १८०६ दशलक्ष युनिट वीज वापरली. मे महिन्यात ही मागणी वाढून २७१० दशलक्ष युनिट झाली. मार्चच्या तुलनेत ९०४ दशलक्ष युनिट्स म्हणजेच पन्नास टक्के वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की मार्चमध्ये १०० युनिट्सपर्यंत वापरणाऱ्यांची संख्या १.६४ कोटी होती. परंतु जास्त वापरामुळे या श्रेणीतील ग्राहकांची संख्या १.३६ कोटींवर घसरली. दुसरीकडे, १०० ते ३०० युनिट वापरणाऱ्यांची संख्याही ५८ लाखांवरून ७७ लाखांवर गेली आहे. या ग्राहकांना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेले जादा दर भरावे लागले, अशा परिस्थितीत बिलात वाढ होणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टelectricityवीज