शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

नागपूर शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प : एसएनडीएलचे व्हेंडर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:01 IST

मुसळधार पावसादरम्यान वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या व्हेंडरतर्फे काम बंद करण्यात आल्याने शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प पडली आहे.

ठळक मुद्देपावसाने वाढली समस्या१०८४ तक्रारी, एकाचेही निराकरण नाही, २३ ब्रेकडाऊनही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसादरम्यान वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या व्हेंडरतर्फे काम बंद करण्यात आल्याने शहरातील वीज वितरण यंत्रणा ठप्प पडली आहे. एसएनडीएलच्या भागात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तब्बल १०८४ तक्रारी शुक्रवारी दाखल झाल्या. २३ फिडर ब्रेकडाऊनमुळे ठप्प पडले. परंतु व्हेंडर संपावर होते. त्यामुळे कमी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दुरुस्तीचे काम करण्यात आले. यात खूप वेळ लागला. दरम्यान व्यक्तिगत स्वरुपाच्या बहुतांश तक्रारीचे निराकरण झाले नसल्याची माहिती आहे.एसएनडीलने काम सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर महावितरणने कामकाज सांभाळण्याची तयारी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत एसएनडीएलचे व्हेंडर (ठेकेदार-एजन्सी) आपले थकीत ५० कोटी रुपये परत करण्यात मागणीसाठी शुक्रवारी संपावर गेले. ५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रविभवन येथे निदर्शने केली. शहरातील दोन मोठे व्हेंडर यात सहभागी झाले नसल्याने व्हेंडरच्या संपाला झटका बसला. मात्र मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा प्रभावित होऊ लागला. ग्राहकांच्या तक्रारी येऊ लगल्या. परंतु त्या अटेंड करण्यासाठी कुणीच नव्हते. सकाळी ११.४० वाजेपासून ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत १७ फीडर ब्रेकडाऊन झाले. यात गुलमोहरनगर, किनखेडे ले-आऊट, कमाल चौक, चिखली ले-आऊट, जुनी शुक्रवारी, बाबा फरीदनगर, रिंग रोड, कामठी रोड, आयबीएम, राजाबाक्षा, रामबाग, विश्वकर्मानगर, अजनी रेल्वे, विधानभवन, मेडिकल चौक व एस.टी.स्टँड फीडरचा समावेश होता. नंतर पुन्हा सहा ब्रेकडाऊन झाले. ग्राऊंड स्टाफ संपावर असल्याने दुसरीकडील कर्मचारी आणून दुरुस्ती करण्यात आली. १७ ब्रेकडाऊन रात्री ८ वाजेपर्यंत दुरुस्त होऊ शकले. दुसरीकडे व्यक्तिगत १०८४ तक्रारी सोडवण्यासाठी एसएनडीएलकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्या सोडवता आल्या नाही.बॉक्स -कठीण परिस्थितीतही देत आहोत सेवा - एसएनडीएलएसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराना यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्वीकार करीत कंपनी कठीण परिस्थितीतही सेवा देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, नागरिकांना कुठलीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून कंपनी कमी मनुष्यबळातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. महावितरणने व्हेंडरला काम देण्याचे आश्वासन दिले आहे. एसएनडीएलचे सर्व कर्मचारी कामावर आहेत.महावितरणचे पॉवर ट्रान्सफार्मर फेलसमस्या केवळ एसएनडीएलच्या क्षेत्रातच निर्माण झाली असे नाही. महावितरणच्या चिंचभुवन सब स्टेशनचे पॉवर ट्रान्सफार्मर फेल झाल्याने तेथून मनीषनगरपर्यंतचा परिसर अंधारात बुडाला. या सबस्टेशनमध्ये दोन पॉवर ट्रान्सफार्मर आहेत. परंतु यापैकी एक अनेक दिवसांपासून खराब आहे. गणेशोत्सवादरम्यान अखंडित वीज पुरवठ्याच्या देखभालीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. परंतु काँग्रेसनगर डिव्हीजनचे कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांनी याकडे लक्ष दिले नाही. परिणामी रात्री १२ वाजता एकमेव ट्रान्सफार्मरही फेल झाला. काही भागांना बॅकफीड करून वीज पुरवठा करण्यात आला. परंतु विजेचा लंपडाव रात्रभर सुरू होता. आता दोन्ही ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

टॅग्स :electricityवीजStrikeसंप