शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 18:10 IST

ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

नागपूर : ऊर्जा मंत्रालयाकडून नजीकच्या काळात विजेचे गंभीर संकट ओढवू शकते, कोळशाच्या तुटवडा अशी विविध कारणे सांगितली जात आहेत. परंतु ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. 

ज्या खात्यात सुसंवाद राखला जातो, तेथे कर्मचारी संघटना संप पुकारण्याचा विचार करत नाहीत. राज्यात पुकारण्यात आलेला संप अचानक प्रारंभ झालेला नसून, कर्मचारी संघटनानी दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस दिली होती. पण त्यांच्याशी वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलाही संवाद साधला नाही. आता कर्मचारी रस्त्यावर उतरल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाला जाग येत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे बावनकुळे म्हणाले.    

राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यास ऊर्जा मंत्रालय अपयशी ठरते आहे. याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होणार असून, उन्हाळ्याच्या तोंडावर सामान्यांना त्रास सहन करावा लागेल. ऊर्जा मंत्रालयाचा महावितरणच्या संचालक मंडळाशी सुसंवाद नाही म्हणून हा दिवस बघण्याची वेळ आली, असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राज्यात सर्वत्र गोंधळ उडालेला आहे. एकीकडे राज्यात वीज तोडणार नसल्याची घोषणा सभागृहात मा. ऊर्जा मंत्र्यानी केली. तरीही शेतकऱ्यांच्या दारी वीज बिलासाठी तगादा लावला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील शेतकऱ्याला वीज जोडणी न देता ४० हजारांचे वीज बिल पाठविण्यात आले. आत्तापर्यंत दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आर्थिक चणचण सहन करतोय. अशात त्याला आधार देण्याऐवजी वसुली धोरण राबविणे चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणStrikeसंपelectricityवीजMLAआमदारNitin Rautनितीन राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी