शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात साडेचार लाख कृषीपंपांना वीज कनेक्शन : ऊजामंत्री बावनकुळे यांचे विधानसभेत खणखणीत उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:28 IST

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आणि खणखणीत उत्तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी आज विधानसभेत दिले.

ठळक मुद्देसोलरशिवाय १२ तास वीज शक्य नाही२.१८ लाख शेतकऱ्यांसाठी नवीन योजनाएका ट्रान्सफॉर्मरवर दोन शेतकरी येणारप्रभावी काम करण्यासाठी १० हजार कोटींची गरज

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले असून शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आणि खणखणीत उत्तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी आज विधानसभेत दिले.नियम २९३ अंतर्गत उपस्थित करण्यात आलेल्या सत्ताधारी आमदारांच्या चर्चेत वीजविषयक प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. अत्यंत सविस्तर, दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तर सभागृहात सादर करताना ऊर्जामंत्री  बावनकुळे महापारेषणवरील प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, ३९७२ कोटी रुपयांची गुंतवणूक महापारेषणमध्ये करण्यात येत आहे. नांदेड, धारणी येथील ४०० मेगावॉटचे केंद्र पूर्ण झाले आहेत. ६७ उपकेंद्रे पूर्ण होण्याच्या तयारीत आहेत.३ वर्षात १५ हजार ८९० मेगावॉटने पारेषणची क्षमता वाढली आहे. महापारेषणने आपली यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील पाच वषार्चा आराखडा तयार केला आहे. त्यात ७५ नवीन उपकेंद्र निर्माण करण्यात येणार असून २७०९६ मेगावॉटने पारेषणची क्षमता वाढणार आहे. आणखी ७००० कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मजबूत पारेषण कंपनी उभी करण्यात येणार आहे, असेही ऊर्जामंत्री  म्हणाले.३ कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. ग्राहकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सवार्ना अपेक्षित असलेली महावितरण आणि महापारेषण कंपनी तयार करण्यासाठी १३३९८ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच प्रभावी काम करण्यासाठी महावितरणमध्ये  १० हजार कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण गेल्या ३० वर्षात महावितरणच्या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीवर काहीही खर्च करण्यात आला नाही.३० वर्षांपासून वीजपुरवठा करणारी यंत्रणा आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ऊर्जामंत्री  म्हणाले.भाजपा सेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून थकित वीजबिलासाठी एकाही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. आज शेतकऱ्यांकडे २२ हजार कोटींची वीजबिलांची थकबाकी आहे. १५५९ कोटी नळ योजनांच्या वीज बिलाची थकबाकी आहे.३२४० कोटी रुपये पथदिव्यांची थकबाकी आहे. यातील दंड आणि व्याज बाजूला करून वीजबिलाच्या मूळ रकमेचे १५ समभाग करून थकित वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. पण तरीही वीजबिल भरले जात नाही. ३१ हजार कोटींची ही थकबाकी भरण्यात आली तर संपूर्ण यंत्रणा आधुनिक होऊ शकेल, असे सांगून ऊर्जामंत्र्यांनी जिल्ह्यानुसार थकबाकी सभागृहात वाचून दाखविली.शेतकऱ्यांना दिलेली बिले चुकीची असतील तर दीड महिन्यात शिबिरे घेऊन ती दुरुस्त करून दिले जातील. ज्या शेतकऱ्यांकडे ३० हजार रुपये वीजबिलाचे थकित आहेत, त्यांना फक्त ३ हजार रुपये भरण्यास सांगितले व ३० हजारापेक्षा अधिक वीजबिलाची थकबाकी असेल तर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या योजनेत सहभागी होऊन थकबाकी भरण्याची विनंती सदस्यांनी करावी अशी विनंती सभागृहात ऊर्जामंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांची सक्तीने वसुली करणार नाही, असेही ते म्हणाले.भाजपा सेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून ४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नवीन विजेचे कनेक्शन देऊन केळकर समितीच्या अहवालातील वीज कनेक्शनचा बॅकलॉग दूर करण्यात आल्याचे सांगताना ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, विदर्भ मराठवाड्यातील १ लाख शेतकऱ्यांनी पुन्हा नवीन कनेक्शनसाठी अर्ज केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील१.१८ लाख शेतकऱ्यांचे कनेक्शन प्रलंबित आहेत. २.१८ लाख शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्याची योजना शासन आणत आहे. या योजनेत दोन शेतकऱ्यांना १ ट्रान्सफॉर्मर देणार आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडणे, कमी दाबाने वीज मिळणे या तक्रारी संपणार आहेत. येत्या १५ दिवसात २ शेतकऱ्यांना एक ट्रान्सफॉर्मर ही योजना आपण जाहीर करणार आहोत. मिहान ४.४० रुपये प्रतियुनिट, औद्योगिक क्षेत्राला ४ रुपये प्रतियुनिटने वीज पुरवठा करण्यात येत असल्याचेही ऊर्जामंत्री   म्हणाले.शेतकऱ्यांना कमी दराने वीज पुरवठा करण्यासाठी शासन ६ हजार कोटींची सबसिडी देते. यातील सर्वाधिक सबसिडी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळते.राज्यात सात हजार सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत असल्याचे सांगून शेतकऱ्यांना १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. ४ हजार शेतकऱ्यांना एकाच सौर वाहिनीवर आणण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. नीती आयोगानेही या योजनेचे कौतुक केले असून या योजनेला आता देशाने स्वीकारले आहे. येत्या १० वर्षात सर्व शेतकरी सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न असल्याचेही ऊर्जामंत्री  बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर