शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:03 IST

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.

ठळक मुद्देग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार : महावितरणची नवीन उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ व आॅनलाईन करण्याचे निर्देश दिले होते.या निर्देशानुसार नव्या आॅनलाईन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल अ‍ॅप, ई-मेल व  ट्विटर  इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे. या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मुख्यालय ते शाखा कार्यालयांपर्यंतच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवर तक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर ती किमान नऊ दिवसांत सोडवावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचे वीजबिल बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येईल. परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबिल संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबिल तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबिल ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणा करता येईल.महावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यात आॅनलाईन वीजबिल दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल