शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीला पाणी देत असलेल्या युवकाला विजेचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:03 IST

एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देनागपूरच्या हसनबाग येथील घटना : निष्काळजीपणाही कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.हसनबाग मोठी मशीद जवळ रजा परिवार यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार गुरुवारी सकाळी हुसैन रजा (२६) हा युवक नव्या इमारतीच्या भिंतीला पाणी देत होता. विजेच्या वाहिनी तेथून फार दूर नव्हती. त्यामुळे पाणीचा वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे हुसैन रजाला जोरदार विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर युवकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुसैन रजाचे मोठे भाऊ अमजद रजा यांच्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी १० जानेवारी रोजी एसएनडीएलला पत्र पाठवून एलटी लाईनमुळे धोका होण्याची शंका व्यक्त केली होती. त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते, की ही लाईन खूप खाली आहे. त्याच्याशी अनेक तार जुळलेले आहेत. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. त्याचप्रकारचे एक पत्र स्थानिक नगरसेवक व मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एसएनडीएलच्या पारडी सबस्टेशनच्या अभियंत्यांनाही लिहिले होते. विजेची लाईन रजा कुटुंबाच्या घरापासून खूप जवळ असल्याने अपघात होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. अमजद रजा यांचे म्हणणे आहे की, हे पत्र लिहिल्यानंतरही एसएनडीएलने कुठलीही कारवाई केली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली नाही. यामुळेच आज हा अपघात घडला.प्रकरणाची चौकशी करूवीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलचे म्हणणे आहे की, हसनबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर जुनी विजेची लाईन आहे. एखाद्या ग्राहकाच्या मागणीवरून कंपनी लाईन हटवू शकत नाही. यासाठी इलेक्ट्रीकल इनस्पेक्टरची परवानगी घेणे बंधनकारक असते. कंपनीचे म्हणणे आहे की, लाईनमध्ये एबी केबल लागलेला आहे, अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका नसतो. त्यामुळे दुसऱ्या लाईनमधून विजेचा धक्का बसू शकतो. कंपनीतर्फे घटनास्थळावर चमू पाठवून या प्रकरणाची चौकशी केली जाईल.नागरिकांनीही धडा घ्यावाउच्च न्यायालयाने सुगतनगर प्रकरणात या परिसरातील ११ केव्ही मॉडेल मिल फीडरला धोकादायक परिसर घोषित करून बांधकामावर बंदी घातली आहे. दुसरीकडे हसनबाग येथे अनेक नागरिक वीज वितरण प्रणालीसह खेळत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या खांबाभोवतीच बांधकाम करण्यात आले आहे. या घटनेतून नागरिकांनीही धडा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज