शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

नागपुरातील ‘इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशन’ प्रकल्प पथदर्शी : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:34 IST

कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

ठळक मुद्देइलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्मित इलेक्ट्रिक वाहन चार्जींग स्टेशन हा पथदर्शी प्रकल्प आहे, असे प्रतिपादन महापौरनंदा जिचकार यांनी केले. 

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चार्जींग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती अभय गोटेकर, हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, अग्निशमन व विद्युत समितीचे उपसभापती अ‍ॅड. निशांत गांधी, नगरसेवक संजय चावरे, राजेश घोडपागे, नगरसेविका मंगला खेकरे, रूपाली ठाकूर, विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, एनर्जी आॅडिटर संजय जैस्वाल, एनर्जी मॅनेजर सलीम इकबाल, कनिष्ठ अथिंता प्रकाश रुद्रकार, गजेंद्र तारापुरे, श्यामसुंदर ढगे, प्रदीप खोब्रागडे, प्रशांत काळबांडे, सुनील नवघरे, यांत्रिकी अभियंता (कारखाना) योगेश लुंगे, एम. एम. सोलर प्रा. लि.चे देवेंद्र रानडे, श्याम रानडे उपस्थित होते. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहर शाश्वत विकासाकडे झेप घेत आहे.सभागृहात सौर ऊर्जा निर्माण करून त्या माध्यमातून चार्जींग स्टेशनद्वारे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणे, अशी संकल्पना केवळ गडकरीच मांडू शकतात, अशा शब्दात गौरव करीत महापौर नंदा जिचकार यांनी नागपुरात होत असलेल्या चौफेर विकासकामांवर प्रकाश टाकला.संचालन गिरीश देशमुख यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मानले.

लवकरच होणार दरनिश्चिती सदर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची क्षमता ५० किलो वॅट इतकी असून, यात तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोटोकॉलचे वाहन चार्ज करण्याची सोय आहे. CCS  आणि CHdeMo हे DC प्रकारचे चार्जर व एक AC चार्जर असे तीन चार्जिंग प्रोटोकॉल आहेत. २५ किलोवॅट बॅटरी असलेले वाहन DC चार्जिंगद्वारे साधारण २० ते २५ मिनिटात चार्ज केल्या जाऊ शकेल. इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्याकरिता त्या बसमधील बॅटरीच्या क्षमतेनुसार सुमारे अर्धा ते दीड तास चार्जिंगकरिता लागेल, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर यांनी दिली. चार्जिंगसाठी शासन निर्देशानुसार विद्युत मंडळाच्या दरातील सवलत विचारात घेऊन दरनिश्चिती करण्यात येईल आणि लवकरच चार्जिंग स्टेशन जनतेसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती गिरीश देशमुख यांनी दिली.  

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकारMayorमहापौरelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनnagpurनागपूर