शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरात मेट्रो रेल्वेच्या कामामुळे वीज केबल क्षतिग्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:37 PM

वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे.

ठळक मुद्देमेयो रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित : इंदोरा, नारा, मोमीनपुरा परिसरालाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामांंमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी सुद्धा मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा करणारी केबल लाईन तुटल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ( मेयो ) वीज पुरवठा खंडित झाला. इंदोरा व नारा येथील वीज ग्राहकांनाही फटका बसला. वारंवार इशारा दिल्यानंतरही मेट्रोतर्फे कुठलीही पूर्वसूचना न देता खोदकाम सुरू आहेत. त्यामुळेच वीजपुरवठा करणारी केबल लाईन क्षतिग्रस्त होत असल्याचा दावा वीज वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केला आहे.महामेट्रोचे काम करीत असलेल्या चमूने शुक्रवारी मेयो रुग्णालयासह उत्तर नागपुरातील वीजपुरवठा करणाऱ्या दोन प्रमुख फिडर केबल तोडले. यात इंदोरा चौकातील मेयो-आंबेडकर रुग्णालय इंटरलिंक फीडरचा समावेश आहे. या फीडरवरून उप्पलवाडी, नारा, आणि मेयोसह परिसरातील वस्त्यांना वीजपुरवठा केला जातो. केबल लाईन तुटल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या नुकसानभरपाईसाठी एसएनडीएलने मेट्रोला सांगितले आहे.एसएनडीएलचे म्हणणे आहे की, मेट्रो रेल्वेने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांच्यामुळेच मोमीनपुरा, अंसारनगर, भानखेडा परिसरात वीजपुरवठा खंडित होता. शनिवारी दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.२३ हजार वीज ग्राहक प्रभावित,७६ लाख रुपये थकीतएसएनडीएलचे म्हणणे आहे की, वीजपुरवठा केबल क्षतिग्रस्त झाल्याने २३ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. याशिवाय मेयो रुग्णालयात दाखल रुग्णांनाही त्रास सहन करावा लागला. मेट्रो रेल्वेवर ७६ लाख रुपये थकीत असल्याचा दावाही एसएनडीएलने केला आहे. ही रक्कम वीजपुरवठा यंत्रणेला नुकसान पोहोचवल्यामुळे मेट्रोला द्यावयाची आहे, असे एसएनडीएलचे म्हणणे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMetroमेट्रो