शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

जि.प.,प.सं.निवडणूक; भाजप, सेनेचा स्वबळाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:23 IST

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्देकॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीअर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, तिकिटासाठी चढाओढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेने जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. इकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करीत जि.प.वर झेंडा फडकविण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १८ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली असली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी रविवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. रविवारी दिवसभर भाजप, सेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. तीत जि.प.सर्कल आणि पंचायत समिती गणांच्या उमेदवाऱ्या निश्चित करण्यात आल्या. ग्रामीण भागात उमेदवार पळापळवीचे प्रकार आणि स्पर्धक पक्ष एकमेकाचे उमेदवार पाहून आपले उमेदवार निश्चित करण्याची भीती असल्याने यावेळी उमेदवारांच्या नावावर सर्वांनीच गोपनीयता बाळगली आहे. इकडे जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी मिळविण्यावरुन कार्यकर्त्यात चढाओढ दिसून आली.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले. मात्र अधिवेशन काळात पाचही दिवस विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार त्यांच्या नेत्यांकडे तिकिटासाठी लॉबिंग करताना दिसून आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड केला आहे. जिल्ह्यात शिवसेना स्वबळावर जि.प. व पं.स.निवडणूक लढवित असल्याचे खा.कृपाल तुमाने यांनी सांगितले. इकडे भाजपने यावेळी जि.प.वर स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा संकल्प केला आहे.जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल आणि ११६ पंचायती समिती गणात मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी दिली. जि.प.साठी भाजपकडे ७०० हून अधिक इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. जिल्ह्यात भाजपने पुणे येथील एका खासगी संस्थेच्या माध्यमातून उमेदवारांच्या चाचपणीसाठी सर्वेक्षण केले. भाजपने कुणाचीही शिफारस विचारात ने घेता केवळ मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित केल्याचे पोतदार यांनी सांगितले.ए.बी.फॉर्मचे वाटप वेळेवरपक्षातील बंडखोरी आणि उमेदवारांची पळापळव टाळण्यासाठी भाजपकडून सोमवारी सकाळी ११ वाजता ए.बी.फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे भाजपने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.जागावाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात४काँग्रेस-राष्ट्रवादीने जि.प.त भाजपला रोखण्याचा संकल्प केला आहे. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे आघाडीवर एकमत झाले आहे. रविवारी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची रविभवन येथे सकाळी आणि सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार, प्रदेश सरचिटणीस किशोर गजभिये, जेष्ठ नेते नाना गावंडे, डॉ. आशिष देशमुख तर राष्ट्रवादीकडून आ. अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग व जिल्हाध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. सकाळी झालेल्या बैठकीत जागावाटपाचा तिढा न सुटल्याने पुन्हा सायंकाळी हे नेते एकत्र आले. तीत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुळक यांना विचारणा केली असता, जागावाटपाचा फॉम्युूला निश्चित झाल्याचे सांगितले. मेरिटच्या आधारावर उमेदवार निश्चित करण्यात आल्याचा दावा मुळक यांनी केला. सकाळच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यात काही जागांवर उमेदवाराच्या नावावर आपसात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. हिंगणा तालुक्यातील जि.प. सर्कलची ही जागा असल्याचे समजते. सायंकाळच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यात ५८ जि.प. सर्कलवर चर्चा झाली. यात स्थानिक आमदारांनी त्यांच्या पक्षानुसार आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेतल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला.

टॅग्स :zpजिल्हा परिषद