शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवडणूक चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 02:01 IST

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे हे विजयी झाले, तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्षपदी निवडून आले.

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सत्यजित तांबे हे विजयी झाले, तर आ.अमित झनक व कुणाल राऊत हे उपाध्यक्षपदी निवडून आले. यासोबतच ११ महासचिव व ४८ सचिवांच्या पदांसाठी झालेल्या निवडणूकीचीदेखील शुक्रवारी मतगणना झाली. महासचिव व सचिवपदासाठी अनेक उमेदवारांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. अगदी निसटत्या मतांनी काही जणांची विजयाची संधी हुकली, अशी माहिती सूत्रांनी दिली.नागपूर येथील देवडिया भवनात शुक्रवारी मतमोजणी पार पडली. तरुण त्यागी यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी प्रदेश निवडणूक अधिकारी सज्जाद तारीक व सुधीर चौधरी यांनी निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सांभाळली. युवक कॉंग्रेसकडून शुक्रवारी सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होते. मात्र रात्री उशीरापर्यंत अधिकृत घोषणा झाली नाही. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून महासचिव व सचिवपदाच्या उमेदवारांची नावे समोर आली आहेत. आम्ही सविस्तर निकाल शनिवारी आमच्या ‘आयवायसी.इन’ या संकेतस्थळावर जाहीर करू, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेचे जनसंपर्क अधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली.नवनियुक्त पदाधिकारी अध्यक्ष : सत्यजित तांबे, उपाध्यक्ष : अमित झनक, कुणाल राऊत, मसरुर खान, नागसेन भेर्जे महासचिव : आदित्य सावळेकर, आमीर अब्दुल सलिम, आदित्य पाटील, ब्रिजकिशोर दत्त, अनिकेत म्हात्रे, करण ससाने, श्रीनिवास नलमवारसचिव : अभय देशमुख, अभिजित अवचार, अभिषेक भार्गड, अजयकुमार इंगवले, अजिंक्य भोईर, अजित सिंग, अकिल पटेल, अलोक पवार, अमरिश भोई, आशिष गिरी, अतुल वाघ, भास्कर गुंजाल, भूषण मरसकोल्हे, दिग्विजय दळवी, फिरोज शाह, गणेश जगताप, इद्रीस नवाब खान, इंद्रजित साळुंके, जयदीप शिंदे, महानिंगप्पी महाशेट्टी, मिलिंद चिट्टे, मो.कादर शेख, नीलेश काटे, नीलेश खोब्रागडे, नितीन पाटील, पंकज जगताप, प्रभाकर मुत्थे, पुनित पाटील, राजीव पाटील, रोहित खैरवार, रुचित दवे, रुपेश जैस्वाल, सचिन कट्याल, सचिन पाटील,सागर देशमुख, सागर कावरे, सलाम अब्दुल, समीर जवंजाळ, शंभुराजे देसाई, श्रेयस इंगोले, तनवीर अहमद सिद्दीकी, उमेश ठाकूर, विकी बघेले, विजयसिंग मोरे, विक्रम ठाकरे, विनोद भोसले,महेश ढगे.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेस