शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:09 IST

लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत विदर्भातील सात खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या खासदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे.गडकरी नागपूर, तुमाने रामटेक, नेते गडचिरोली-चिमूर, मेंढे भंडारा-गोंदिया, जाधव बुलडाणा, धानोरकर चंद्रपूर तर तडस वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे यांच्यासह एकूण तिघांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी तुमाने यांच्या निवडणुकीला तर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे, बळीराम सिरसकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोले व धनराज वंजारी यांनी इतर खासदारांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूकMember of parliamentखासदारVidarbhaविदर्भ