शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बीएमएच्या निवडणुकीत दोन अध्यक्षांची निवड !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 28, 2024 22:24 IST

- उद्योजकांचा वाद चव्हाट्यावर : दोन्ही गटांचा अध्यक्षपदावर दावा

नागपूर : विदर्भातील उद्योजकांची आघाडीची शिखर संघटना बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (बीएमए) द्विवार्षिक निवडणुकीत येथील उद्योजक सदस्यांचा वाद चव्हाट्यावर आला असून दोन्ही गटांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. एका गटाने नागपुरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे पत्र पाठवून आमचीच निवड योग्य असल्याचे सांगितले आहे.

मावळते अध्यक्ष नितीन लोणकर यांच्या पहिल्या गटाने जीवन घिमे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने डॉ. किशोर मालविय यांची निवड योग्य असल्याचे सांगितले आहे. बीएमएचा खरा अध्यक्ष कोण, हा गुंतागुंतीचा वाद आता दोन्ही गटाने एकत्रित बसून सोडवायचा आहे.घोषणेनुसार जीवन घिमे अध्यक्ष

घडामोडीनुसार, बीएमएची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बुटीबोरी येथील असोसिएशनच्या सभागृहात २५ पदाधिकारी आणि ईसी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते अध्यक्ष नितीन लोणकर यांनी कार्यकाळातील कामकाजाची माहिती दिली, तर सचिव शशिकांत कोठारकर यांनी भाषणानंतर निवडणुकीची घोषणा केली. आतापर्यंत कार्यकाळात सर्वानुमते अध्यक्ष निवडीची परंपरा आहे. त्यानुसार बीएमएचे माजी अध्यक्ष हेमंत अंबासेलकर, पी.के. बसाक आणि प्रवीण चौरसिया यांची समिती बनविण्यात आली. सभेनंतर लोणकर यांनी ईसी समिती सदस्य जीवन घिमे यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार प्रारंभी जीवन घिमे हे बीएमएचे अध्यक्ष ठरले.

बॅलेट मतदानाने डॉ. किशोर मालविय अध्यक्षत्यानंतरच एक महिन्यांपासून सोशल मीडियावर उद्योजकांमध्ये सुरू असलेला सुप्त वाद चव्हाट्यावर आला. दुसऱ्या गटाने बॅलेटने मतदान घेण्याची मागणी करीत अध्यक्षपदासाठी डॉ. किशोर मालविय यांचे नाव सुचविले. तोपर्यंत नितीन लोणकर, जीवन घिमे यांचा गट सभागृहाबाहेर पडला. बॅलेट मतदानासाठी त्यांना सभागृहात येण्याची मोबाईलवरून सूचना देण्यात आली. जीवन घिमे यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली आणि सभा संपल्याने कामकाज होणार नाही, असे लोणकर यांनी सांगितले. पण दुसरा गट बॅलेट मतदानावर अडून बसला. अखेर रात्री ९ वाजता दुसऱ्या गटाने नितीन लोणकर आणि त्यांच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत बॅलेट मतदान घेतले आणि २५ पैकी १४ मते डॉ. किशोर मालविय यांना पडल्याने ते अध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले. यानुसार बीएमएच्या निवडणुकीत दोन अध्यक्षांची निवड करण्यात झाली. अखेर महिन्यापासून सुरू असलेल्या वादावर दोन अध्यक्षांच्या निवडीने पडदा पडला. पण आता हा वाद पुढे चांगलाच रंगणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. 

वाद धर्मदाय आयुक्तांकडेअनेक वर्षांपासून बीएमए अध्यक्षाची निवड सर्वानुमते होते. तशीच निवड यंदाही झाली. जीवन घिमे अध्यक्ष झाले. बीएमएची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी आहे. निवडणूक घ्यायची असल्यास धर्मदाय आयुक्त कार्यालयाला कळवावे लागते. त्यानुसार दिनांक आणि वेळ ठरविली जाते. मतदान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते. ही प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे दुसऱ्या गटाचा अध्यक्ष अवैध आहे.नितीन लोणकर, मावळते अध्यक्ष, बीएमए.

टॅग्स :nagpurनागपूर