शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

नागपूर जिल्ह्यातील मरुपारमध्ये होणार का ग्रा.पं.निवडणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:56 IST

२६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या प्रकल्पग्र्रस्तांच्या मागण्या व समस्या अद्यापही निकाली निघालेल्या नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रतिनिधीसुद्धा या ग्रामपंचायतपासून चार हात लांब आहे. सत्ताधारी भाजपने मरुपार ग्रामपंचायतच्या निवडणुकीबाबत मौन बाळगले असले तरी काँग्रेसने ‘मिशन मरुपार’ सुरू केले आहे. या वृत्ताला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला.

ठळक मुद्देदोन निवडणुकीत होता बहिष्कार : काँग्रेस सक्रिय, भाजपचे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २६ सप्टेंबर रोजी तालुक्यात होऊ घातलेल्या ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मरुपार ग्रामपंचायत लक्षवेधी ठरली आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांत मरुपार येथून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे या ग्रामपंचायतची सूत्रे प्रशासक सांभाळत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळत असलेल्या प्रकल्पग्र्रस्तांच्या मागण्या व समस्या अद्यापही निकाली निघालेल्या नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात लोकप्रतिनिधीसुद्धा या ग्रामपंचायतपासून चार हात लांब आहे. सत्ताधारी भाजपने मरुपार ग्रामपंचायतच्या निवडणुकीबाबत मौन बाळगले असले तरी काँग्रेसने ‘मिशन मरुपार’ सुरू केले आहे. या वृत्ताला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दुजोरा दिला.सात सदस्यीय मरुपार ग्रामपंचायतमधील सरपंचपद सर्वसाधारण स्त्रीकरिता राखीव आहे. मरुपार ग्रामपंचायतची एकूण मतदारसंख्या ५९२ आहे. यात ३०६ पुरुष तर २८६ महिला मतदारांचा समावेश आहे. मरुपार हे गाव गोसेखुर्द  राष्ट्रीय  प्रकल्पात बुडित क्षेत्रात असून या गावाचे पुनर्वसन  राष्ट्रीय  मार्गावरील गोंडबोरी शिवारात करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, समस्या व पुनर्वसन स्थळावरील नागरी सुविधांवरून प्रकल्पग्रस्त विरुद्ध शासन-प्रशासन, असा संघर्ष मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी ढुंकूनही बघत नसल्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांनी निवडणुकीवर बहिष्काराचे शस्त्र वापरले आहे. सन २०१६ व १७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूक कार्यक्रमात मरुपार ग्रामपंचायतचा समावेश होता. मात्र येथून उमेदवारी अर्जच दाखल होत नसल्यामुळे ही ग्रामपंचायत सतत प्रशासकाच्या हाती आहे.सेनेची उडीभिवापूर नगरपंचायतच्या निवडणुकीपासून सेनेत फाटाफूट झाली. सेना दोन गटात विभागल्या गेली. काहींनी राजीनामास्त्र वापरले तर काहींना हकालपट्टीच्या कार्यक्रमाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सेना काहीशी लांब होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शिवसेनेने उडी घेतली. ३६ ग्रामपंचायतीत पॅनल उभे करणे शक्य नसले तरी तास, पिरावा, चिखली, शिवापूर, किन्हाळा या ग्रामपंचायतीमध्ये सेनेचे समर्थित पॅनल राहण्याची शक्यता आहे.११ ग्रामपंचायतींसाठी ९१ अर्जउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी झिलबोडी ग्रा.पं. ५, उखळी ७, मेढा १०, जवळी १५, वाकेश्वर ३, वासी ७, मालेवाडा ९, नांद ६, भगवानपूर ७, धामणगाव (ग.) १, महालगाव ९ असे एकून ७९ अर्ज सदस्य पदांकरिता आले. तर सरपंच पदाकरिता जवळी व वाकेश्वर येथून प्रत्येकी दोन अर्ज तर धामणगाव वगळता इतर ठिकाणाहून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. असे सरपंच व सदस्य पदाकरिता एकूण ९१ अर्ज दाखल झाले.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक