लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीची घोषणा झाल्याबरोबर भाजपच्या गोटात उमेदवारीबाबत हालचालींनी वेग घेतला आहे. प्रभागपातळीवर निरीक्षकांनी मुलाखती घेतल्यानंतर आता भाजपच्या कार्यालयात मंगळवारपासून मुलाखतींचे सत्र सुरू होणार आहे. सोबतच पक्षाकडून निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत भाजपच्या गणेशपेठ कार्यालयात होतील. विधानसभा व प्रभागानुसार मुलाखती होणार आहे. १६ डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम नागपूर, १७ डिसेंबर रोजी उत्तर व दक्षिण नागपूर, १८ डिसेंबर रोजी दक्षिण-पश्चिम व मध्य नागपूर अशा मुलाखती होतील.
सोबतच भाजपने महानगरपालिकांसाठी विधानसभा क्षेत्रानुसार प्रभारींची नियुक्ती केली आहे. पूर्व नागपुरसाठी माजी आमदार अनिल सोले, पश्चिम नागपूरसाठी राजेश बागडी, दक्षिण-पश्चिमसाठी आ.प्रवीण दटके, मध्य नागपूरसाठी माजी आमदार गिरीश व्यास, दक्षिण नागपूरसाठी भोजराज डुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच नियोजनासाठी निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आ.प्रवीण दटके हे निवडणूक प्रभारी असतील. निवडणूक प्रमुख म्हणून संजय भेंडे, सहप्रमुख म्हणून विष्णू चांगदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
महायुतीशी समन्वयाची जबाबदारी तीन नेत्यांवर
दरम्यान महायुती एकत्रित लढणार असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे महायुती समन्वयाची जबाबदारी शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आ.प्रवीण दटके व प्रा.संजय भेंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रचार यंत्रणा समन्वयक म्हणून आ.संदीप जोशी, रितेश गावंडे हे काम पाहतील.
Web Summary : As Nagpur Municipal Corporation elections approach, BJP intensifies preparations. Candidate interviews begin at the party office. Committees are formed for election management and coordination with allies. Key leaders are assigned responsibilities for various zones and campaign strategies.
Web Summary : नागपुर महानगरपालिका चुनाव नजदीक आते ही भाजपा ने तैयारियां तेज कर दी हैं। पार्टी कार्यालय में उम्मीदवारों के साक्षात्कार शुरू। चुनाव प्रबंधन और सहयोगियों के साथ समन्वय के लिए समितियां गठित। विभिन्न क्षेत्रों और अभियान रणनीतियों के लिए प्रमुख नेताओं को जिम्मेदारियां सौंपी गईं।