शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

काटोल पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 20:58 IST

काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नाही यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाने नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वक्तव्य करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात वक्तव्य : नवीन कार्यक्रमाच्या मागणीचा अर्ज खारीज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नाही यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यास भारतीय निवडणूक आयोगाने नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वक्तव्य करण्यात आले.गेल्या १२ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांची काटोल पोटनिवडणुकीविरुद्धची रिट याचिका मंजूर करून या निवडणुकीचा कार्यक्रम अवैध ठरवून रद्द केला. त्या निर्णयाविरुद्ध भिष्णूर (ता. नरखेड) येथील सरपंच दिनेश टुले व काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. अपिलवरील पहिल्या सुनावणीच्यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती मागितली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. निवडणूक आयोग व इतर प्रतिवादींना केवळ नोटीस बजावून याचिकेवर उत्तर सादर करण्यास सांगितले. दरम्यान, अपिलकर्त्यांनी दिवाणी अर्ज दाखल केला व वेळेचे महत्त्व लक्षात घेता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देऊन नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश आयोगाला देण्यात यावे अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. त्या अर्जावर न्यायमूर्तीद्वय इंदिरा बॅनर्जी व संजीव खन्ना यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने यावर आयोगाचे म्हणणे विचारले असता, आयोगाने येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे ही पोटनिवडणूक घेणे व्यावहारिक होणार नाही अशी भूमिका मांडली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने संबंधित दिवाणी अर्ज फेटाळून लावला व मूळ याचिकेवर उन्हाळ्याच्या सुट्यानंतर, म्हणजे जुलैमध्ये पुढील सुनावणी निश्चित केली. अपीलकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अर्जुनसिंग भाटी तर, प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. किशोर लांबट व इतरांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय