शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृद्ध डॉक्टरला मारहाण : दोघांना अटक, साथीदार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:43 IST

मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आणि गुरुवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देटोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आणि गुरुवारी रात्री ही घटना घडली.डॉ. ज्ञानेश बापूराव ढाकुलकर (वय ६०) हे सक्करदऱ्यातील दत्तात्रयनगर सर्वेश्वर मंदिराजवळ राहतात. २५ जूनला त्यांना मंदिराजवळ एक प्रेमीयुगुल आढळले. त्यामुळे ढाकुलकर यांनी विचारपूस करून त्यांना हुसकावून लावले. त्याचा राग मनात ठेवून गुरुवारी रात्री ९.४० ला आरोपी निहाल अशोक गणवीर, संकेत अनिल गजभिये, आर्यन रामभाऊ मेश्राम, निखिल अशोक गणवीर, अनिकेत ताजने, हर्ष लोणारे आणि त्यांचा एक साथीदार मंदिराजवळ आले. यावेळी ढाकुलकर आणि अन्य ज्येष्ठ नागरिक मंदिरासमोर बसून गप्पा करत होते. आरोपीने ढाकुलकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ते पाहून अन्य ज्येष्ठ नागरिक ढाकुलकर यांना वाचविण्यासाठी पुढे आले असता आरोपींनी त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी जमल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेची तक्रार ढाकुलकर यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपी निहाल गणवीर आणि संकेत गजभिये या दोघांना अटक केली. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर