शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दांपत्याने घेतले विष, ८० वर्षीय होमियोपॅथी तज्ज्ञ पतीचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 20:16 IST

पत्नी आयसीयूमध्ये अत्यवस्थ : वृद्धावस्था व आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकमेकांचीच साथ असलेल्या वृद्ध दांपत्याने घरीच बुधवारी सकाळी विषप्रशान केले. यात होमियोपॅथी तज्ज्ञ असलेल्या ८० वर्षीय पतीचा मृत्यू झाला तर पत्नी इस्पितळात अत्यवस्थ अवस्थेत जीवनमरणाचा संघर्ष करत आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ नगरी येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धावस्था व आजारपणाला कंटाळून या दांपत्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

मृत व्यक्तीचे नाव ८० वर्षीय गंगाधरराव बालाजी हरणे असे असून निर्मला हरणे (७०) या त्यांच्या पत्नी आहेत. दोघेही समर्थनगरीतील प्लॉट क्रमांक १०४ येथे राहत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा सुधीर नोकरीनिमित्त बाहेरील राज्यात राहतो तर मुलगी शुभांगी ही सासरी असते. कोरोनानंतर हरणे दाम्पत्याची प्रकृती बरेचदा बिघडली होती. गंगाधररावांवर शस्त्रक्रियाही झाली होती. उपचार घेतल्यानंतरही वृद्धापकाळामुळे आराम मिळाला नाही. यामुळे दोघेही नैराश्यात होते. आपल्यानंतर आपल्या पत्नीचे कसे होईल याची हरणे यांना चिंता होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी दोघांनीही विष प्राशन केले. सकाळी ८ वाजता शेजाऱ्यांनी घराच्या व्हरांड्यात हरणे दाम्पत्याला पडलेले पाहिले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. जवळच दोन प्लास्टिक ग्लास ठेवले होते. शेजाऱ्यांनी हरणे दाम्पत्याची मुलगी शुभांगी हिला कळवले. मुलगी लगेच घरी पोहोचली. मुलीने शेजाऱ्यांच्या मदतीने तिच्या पालकांना रुग्णालयात पाठवले. घराचा दरवाजा बंद होता. त्याची चावी बाजूलाच ठेवली होती. रुग्णालयात नेले असता हरणे यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस ठाण्याचे पथकदेखील पोहोचले.

सुसाईड नोटमुळे समोर आले आत्महत्येचे कारणपोलिसांनी घराची झडती घेतली. हरणे दाम्पत्याची सुसाईड नोट सोफ्यावर ठेवण्यात आली होती. कचऱ्याच्या डब्यात विषाचा डबीदेखील सापडली. आत्महत्येचे कारण सुसाईड नोटमधून उघड झाले. चिठ्ठीत हरणे यांनी वृद्धापकाळ, आजार आणि एकाकी जीवनामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी घेतलेली काळजी आणि उपचारांबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आणि स्वेच्छेने आत्महत्या केल्याचे नमूद केले. सोनेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर