शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

‘स्वीट’ सुपारीमुळे आठ वर्षाच्या मुलीला झाला कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:08 IST

वयाच्या चौथ्या वर्षापासून ‘स्वीट सुपारी’ खाण्याची सवय लागलेल्या यशोदाला वयाच्या १३ व्या वर्षी मुखपूर्व कर्करोगाचे निदान झाले.

ठळक मुद्देशासकीय दंत रुग्णालयात यशस्वी उपचार

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपारी, गुटखा सेवनामुळे होणाऱ्या मुखपूर्व कर्करोगाचे (ओरल सबम्युकस फायब्रोसिस) प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा रोग मोठ्यांना व्हायचा, परंतु आता लहान मुलांमध्येही याचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून ‘स्वीट सुपारी’ खाण्याची सवय लागलेल्या यशोदाला वयाच्या १३ व्या वर्षी मुखपूर्व कर्करोगाचे निदान झाले. तिला तोंड उघडणेही शक्य होत नव्हते. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख शल्यचिकित्सा विभागाने तिच्यावर यशस्वी उपचार केल्याने कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराला दूर ठेवणे तिला शक्य झाले.राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. परंतु विदर्भाच्या गावखेड्यांपासून ते शहरातील गल्लीबोळातील बहुसंख्य पानठेल्यांवर सर्रास तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. तोंडात खर्ऱ्याचा बोकना आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाऱ्यांचे ‘परिणाम’ मात्र आता दिसून येऊ लागले आहेत. खर्ऱ्यामुळेच तोंडाचा किंवा घशाचा कर्करोगाच्या रुग्णांत प्रचंड वाढ झाली आहे. या रोगाची सुरुवात खर्ऱ्यामुळेच होते असे नाही तर, शाळेच्या परिसरात चॉकलेटस्, गोळ्या, बिस्किट विकणाऱ्या दुकानात मिळणाºया ‘स्वीट सुपारी’मुळेही होत असल्याचे समोर आले आहे. या सुपारीचे व्यसन लागून विद्यार्थ्यांमध्ये मुखपूर्व कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे मुख शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, शासकीय दंत रुग्णालयात उपचारासाठी आलेली ‘यशोदा’ची कहाणी थक्क करणारी आहे. तिला वयाच्या आठव्या वर्षापासून शाळेबाहेर मिळणाऱ्या गोळ्या-बिस्किटांच्या दुकानातून स्वीट सुपारी खाण्याची सवय लागली. पुढे ही सवय कधी व्यसनात बदलली तिलाही कळले नाही. परिणामी, ओरल सबम्युकस फायब्रोसिस रोगाला समोर जावे लागले. तिच्यावर तातडीने उपचाराला सुरुवात केल्याने कॅन्सरसारखा जीवघेणा आजार टाळणे शक्य झाले.एक सेंटिमीटरही तोंड उघडणे होते अवघडडॉ. दातारकर म्हणाले, वयाच्या आठव्या वर्षापासून यशोदाला स्वीट सुपारीचे व्यसन लागले. सलग पाच वर्षे ती ही सुपारी खात होती. जेव्हा वयाच्या १३ व्या वर्षी रुग्णालयात उपचारासाठी आली, तेव्हा यशोदाचे तोंड एक सेंटिमीटरही उघडत नव्हते. यातच उजव्या बाजूच्या जबड्याच्या खालच्या भागात तिला दुखणे होते. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून हा त्रास होत. अलीकडे तो वाढल्याने तिच्या पालकांनी शासकीय दंत रुग्णालयात उपचारासाठी आणले. गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराला ती चांगली प्रतिसाद देत आहे.शाळेच्या परिसरात चॉकलेटस्, बिस्कीट सोबतच काय विकत मिळते, हे पालकांनी पाहायला हवे. सोबतच आपला मुलगा-मुलगी काय खातात, याकडेही लक्ष द्यायला हवे. ‘स्वीट सुपारी’सारखे पदार्थ मिळत असतील तर त्याचे धोके ओळखायला हवे. लहान मुलांमध्ये या सुपारीमुळे ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’चे प्रमाण वाढत आहे. दहा वर्षानंतर हा आजार मुखाच्या कर्करोगात बदलतो.-डॉ. अभय दातारकर, प्रमुख, मुख शल्यचिकित्सा विभाग, डेन्टल

टॅग्स :cancerकर्करोग