शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ते हैदराबादपर्यंत होणार आठपदरी महामार्ग; नितीन गडकरींचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 06:53 IST

नागपुरात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आहे. सध्या या प्रवासाला आठ ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होत आहे.

नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नागपूर-गोवा महामार्गानंतर आता नागपूर हैदराबाद महामार्ग तयार होण्याची आशा बळावली आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी चर्चा करताना हा नवा महामार्ग साकार होण्याचे संकेत दिले. हा महामार्ग आठपदरी होईल. त्यामुळे नागपूर-हैदराबाद हे सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेतीन तासात पार करता येणार आहे. सध्या या प्रवासाला आठ तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो

नागपुरात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आहे. सध्या या प्रवासाला आठ ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते गोवा महामार्गाची घोषणा केली आहे. आता गडकरी यांनी नागपूर ते हैदराबाद महामार्गाचा प्रस्ताव ठेवला असून त्याचा डीपीआरसुद्धा तयार आहे. देशभरात रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा संकल्प असून यात नागपूर हैदराबाद महामार्गाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर हा सुपरफास्ट महामार्ग असणार आहे.

पुण्यासाठी समृद्धी महामार्गाशी जुळणार स्वतंत्र मार्गनागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी कुठलीही विशेष सुविधा नाही. १२ ते १५ तास लागतात. ही अडचण दूर करण्यासासाठी समृद्धी महामार्गाला लागून जालना ते नगर आणि पुण्याला जोडण्यासाठी एक नवीन मार्ग तयार करण्याची योजना आहे. यामुळे नागपूर ते पुणेपर्यंतचा प्रवास अधिक सुखकारक होईल.

महामार्गासाठी पुन्हा बॉण्ड ■ गडकरी यांनी पुढील वर्षी २५ हजार कोटी रुपयांचे रस्ते बनवण्याचा मानस व्यक्त केला.■ महामार्ग विकासासाठी निधी प्राप्त करण्याच्या उद्देशाने बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. आता पुन्हा बॉण्ड जारी करण्याची तयारी आहे. जेणेकरून नागरिकांकडून गुंतवणूक प्राप्त केली जाऊ शकेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग